Muslim Man Fact check Video : लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडियावर एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे आढळून आले. या व्हिडीओमध्ये भारतीय मुस्लिमांना वाचवण्याची विनंती करणारा हॅशटॅगचा वापर करण्यात आला आहे. याशिवाय यात एका वृद्ध व्यक्तीला पुरुषांचा एक गट मारहाण करताना दिसत आहे. हा व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा केला जात आहे, पण खरंच हा व्हिडीओ भारतातील आहे का याबाबत आम्ही तपास सुरू केला, तेव्हा एक वेगळंच सत्य समोर आलं. ते नेमकं काय होतं जाणून घेऊ…

काय होत आहे व्हायरल?

atul subhash
Atul Subhash Suicide Case : अतुल सुभाषच्या सासू आणि मेव्हण्याने केलं पलायन; पोलीस म्हणतात, “त्यांना नजरकैदेत…”
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
Atul Subhash
“मर्द को भी दर्द होता है!” आत्महत्येआधीचा अतुलचा तासभराचा ‘तो’ व्हिडिओ व्हायरल; पत्नी आणि सासरच्यांवर गंभीर आरोप
Atul Suhas Suicide
“न्याय प्रलंबित आहे”, गळ्यात फलक लटकावून तरुणाची आत्महत्या; २४ पानी नोटमुळे पोलिसांसमोर आव्हान वाढले!
Who is Telangana Thalli?
Telangana Thalli : ‘तेलंगणा थळ्ळी’ कोण आहेत? त्यांच्या नव्या पुतळ्यावरुन नेमका वाद का पेटला आहे?
in pune Karvenagar area drunk gang attacked youth due petty dispute
कर्वेनगरमध्ये मद्यपींकडून तरुणावर हल्ला, तिघांविरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गु्न्हा
IND vs AUS Travis Head Reveals Discussion with Mohammed Siraj About Their Fight in 2nd test Watch Video
VIDEO: सिराज आणि हेडमध्ये नेमकं काय बोलणं झालं? सिराजने भांडण मिटवलं का? त्यावर हेड काय म्हणाला?
Iltija Mufti news
Iltija Mufti : “हिंदुत्व हा एक आजार, कारण..”; रतलामचा व्हिडीओ पोस्ट करत इल्तिजा मुफ्ती यांचं वादग्रस्त वक्तव्य

डिम्पी नावाच्या एक्स युजरने तिच्या सोशल मीडिया हँडलवर हा व्हिडीओ शेअर केला असून तो भारतातील असल्याचा दावा केला आहे.

पोस्टचे आर्काइव्ह व्हर्जन पाहा.

https://archive.ph/F6r6V

इतर वापरकर्तेदेखील हाच व्हिडीओ पोस्ट करत आहेत.

तपास:

आम्ही व्हिडीओवरून मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च चालवून आमचा तपास सुरू केला.

यावेळी आम्हाला बांगलादेशातून prothomalo.com वर पोस्ट केलेला व्हिडीओ सापडला. शीर्षकाचा अनुवाद : बरगुनामध्ये स्वातंत्र्य सैनिकाचा छळ : बीएनपी नेत्याच्या मुलाने लाईव्हवर काय म्हटले

https://www.prothomalo.com/video/bangladesh/cquwwchnbb

आम्हाला barishaltimes मध्ये आणखी एक बातमी सापडली, या बातमीत व्हायरल व्हिडीओमधील कीफ्रेम्सदेखील आहेत.

https://www-barishaltimes-com.translate.goog/%E0%A6%AC%E0%A6%B0%E0%A6%97%E0%A7%81%E0%A6%A8%E0%A6%BE -%E0%A6%9C%E0%A7%87%E0%A6%B2%E0%A6%BE-%E0%A6%AE%E0%A7%81%E0%A6%95%E0%A7%8D %E0%A6%A4%E0%A6%BF%E0%A6%AF%E0%A7%8B%E0%A6%A6%E0%A7%8D%E0%A6%A7%E0%A6%BE/? _x_tr_sl=auto&_x_tr_tl=en&_x_tr_hl=en&_x_tr_pto=wapp

बातमीचे शीर्षक होते : बरगुना जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिक संसदेच्या माजी कमांडरला मारहाण, व्हिडीओ व्हायरल

बातमीत म्हटले आहे की : रिपोर्टर, बरिसाल बरगुना जिल्हा मुक्तिजोद्धा संसदेचे माजी कमांडर आणि जिल्हा अवामी लीगचे माजी सदस्य अब्दुर रशीद मिया यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पसरला आहे. बरगुना जिल्हा आयुक्त कार्यालयासमोर रविवारी सकाळी ही घटना घडली. तीन मिनिटे आणि ४२ सेकंदांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये, बरगुना जिल्ह्याचे स्वातंत्र्यसेनानी कमांडर अब्दुर रशीद मिया यांना बरगुना जिल्हा बीएनपीचे माजी अध्यक्ष फारूक मोल्ला यांचा मुलगा शॉन मोल्ला कानाखाली मारताना दिसत आहे.

आम्हाला bdcrime24.com वरदेखील एक बातमी सापडली.

https://bdcrime24.com/%E0%A6%AC%E0%A6%B0%E0%A6%97%E0%A7%81%E0%A6%A8%E0%A6%BE%E0%A6%AF %E0%A6%BC-%E0%A6%AE%E0%A7%81%E0%A6%95%E0%A7%8D%E0%A6%A4%E0%A6%BF%E0%A6%AF% E0%A7%8B%E0%A6%A6%E0%A7%8D%E0%A6%A7%E0%A6%BE%E0%A6%95%E0%A7%87/

या बातमीत म्हटले होते की, बरगुना जिल्हा बीएनपीचे माजी संघटनात्मक सचिव हुमायून हसन शाहीन म्हणाले की, ‘शाओन मोल्ला हा बीएनपीच्या कोणत्याही समितीचा सदस्य नव्हता. त्यांचे वडील माजी समितीचे संयोजक असल्याने पक्षाने ती समिती बरखास्त केली. पण, आता त्याला पक्षात स्थान नाही.

बारगुना हा दक्षिण बांगलादेशातील बरिसाल विभागातील एक जिल्हा आहे.

https://en.banglapedia.org/index.php/Barguna_District

बांगलादेशातील वरिष्ठ फॅक्ट चेकर, तन्वीर महताब अबीर यांनीही पुष्टी केली की, हा व्हिडीओ बांगलादेशात घडलेल्या एका घटनेचा आहे.

निष्कर्ष : एका वृद्ध मुस्लीम व्यक्तीला मारहाण केल्याचा व्हायरल व्हिडीओ भारतातील असल्याचा दावा करत व्हायरल केला जात आहे, पण प्रत्यक्षात तो व्हिडीओ बांगलादेशचा आहे, त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.

Story img Loader