शनिवारी देशभरात मोठ्या उत्साहात बकरी ईद साजरी करण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी मुस्लिम बांधवांनी आपल्या पद्धतीनुसार ईदचे सेलिब्रेशन केले. मात्र राष्ट्रीय स्वंयसेवक संघ (आरएसएस) प्रणित मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केक कापून आपली बकरी ईद साजरी केली. मुस्लिम राष्ट्रीय मंचाने बकरी ईदला जनावरांच्या देण्यात येणा-या बळीच्या प्रथेला विरोध करत एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे. बकरी ईदच्या दिवशी जनावरं नाही तर केक कापा, असे आवाहन मंचाने मुस्लिमांना केले होते. त्यानुसार आपल्यापासूनच सुरुवात लखनऊमध्ये करत त्यांनी केक कापून ईद साजरी केली.

या निर्णयामुळे आपल्या धर्मामध्ये आरएसएस हस्तक्षेप करत असल्याचा आरोप मुस्लिम उलेमाने केला होता. याशिवाय मुस्लिम राष्ट्रीय मंचाने केलेल्या केक कापण्याच्या आवाहनाला विरोधही केला होता. १४०० वर्षांपासून बकरी ईदला जनावरांचा बळी देण्यात येत होता, त्याच प्रथेनुसार विशिष्ट प्राण्याचा बळी देत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. ‘एएनआय’ने यासंबंधीची छायाचित्रे आपल्या ट्विटर अकाऊंटवर अपलोड केली आहेत. बळी देणे इस्लाममध्ये गरजेचं नाही, असं मुस्लिम राष्ट्रीय मंचचे संयोजक राजा रईस यांनी सांगितले. पशू-पक्षी, झाडेझुडपे सर्व काही अल्लाच्या दयेनं आहेत. बकऱ्याच्या आकाराचा केक कापूनही बकरी ईद साजरी केली जाऊ शकते.

Story img Loader