अंकिता देशकर
Haryana Communal Riots Video: हरियाणाच्या नूह जिल्ह्यात सोमवारी जातीय हिंसाचार उसळला आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर विविध व्हिडिओ आणि फोटो प्रचंड व्हायरल होत आहेत. लाईटहाऊस जर्नालिज्मला असाच एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होत असल्याचे लक्षात आले, या व्हिडिओ मध्ये काही लोक, एक बस फोडताना दिसत आहेत. असा दावा करण्यात येत आहे कि हा व्हिडिओ अलीकडील हरियाणात घडत असणाऱ्या घटनेचा आहे. नेमकं हे प्रकरण काय हे ही आपण सविस्तर पाहूया…
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर युजर Sourabh Bari Jhunjhunwala ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर यूजर्स देखील हा व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
व्हिडिओ नीट बघण्यापासून आम्ही व्हिडिओचा तपास सुरू केला. या व्हिडिओ मध्ये आम्हाला दिसले कि बस वर, ‘SITILINK’ असे लिहले होते. हे आम्ही गूगल केले आणि आम्हाला कळले कि, SITILINK हे सुरत, गुजरात मधील, बस रॅपिड ट्रान्सीट सिस्टिम आहे. त्यामुळे आम्हाला आता हे लक्षात आले होते की हा व्हिडिओ सुरत, गुजरात मधील असावा.
आम्ही त्यानंतर गूगल सर्च द्वारे हा व्हिडिओ ऑनलाईन शोधण्याचा प्रयत्न केला.
आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाईट वर एक रिपोर्ट आढळून आला.
त्यानंतर आम्हाला काही व्हिडिओ सापडतात का हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला. ज्यात आम्हाला ABP Asmita वर अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला.
डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: गुजरातच्या सुरतमध्ये मॉब लिंचिंगविरोधात झालेल्या शांततापूर्ण निदर्शनाला अचानक हिंसक वळण आले. जमावाने दगडफेक केली त्यामुळे पोलिसांनी जमावाला रोखण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. गेल्या महिन्यात एका तरुणाला जमावाने मारहाण केल्याची घटना घडली होती. चौकात तरुणाला जमावाकडून मारहाण केली जात होती. तरुणाला मारहाण होत असताना गावातील शेकडो लोक हा तमाशा पाहत उभे होते. दाहोद जिल्ह्यातील फतेपुरा तालुक्यात ही घटना घडली.
आम्हाला TV9 गुजराती द्वारे ४ वर्षांपूर्वी अपलोड केलेला व्हिडिओ देखील सापडला.
प्रवीण पी नावाच्या युट्युब चॅनेलने अपलोड केलेला हाच व्हिडिओ आम्हाला आढळला. हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता. व्हिडिओचे शीर्षक होते: सुरत मॉब फाईट डॅमेजिंग बस १२ जुलै, २०१९
आम्हाला टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर पाठपुरावा करणारा अहवाल देखील सापडला, ज्यामध्ये मॉब लिंचिंग रॅलीतील हिंसाचारासाठी ४० लोकांना अटक करण्यात आल्याचे म्हटले आहे.
आम्हाला Divyang News Channel वर अपलोड केलेला एक व्हिडिओ सापडला, ज्यात लिहले होते कि हा व्हिडिओ नानपुरा, सुरत मधील आहे.
एका बातमीच्या माध्यमातून आम्हाला त्या ठिकाणाविषयी अधिक माहिती मिळाली.
आम्हाला गुगल मॅपवरही घटनेचे अचूक ठिकाण सापडले.
हे ही वाचा<< भाजप प्रदेश प्रमुख व नेत्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण; भररस्त्यात तापलेल्या या वादाचं खरं कारण तरी काय?
निष्कर्ष: २०१९ मध्ये सुरत गुजरातमधील मॉब लिंचिंगच्या निषेधाचा व्हिडिओ, मेवात चकमकीच्या अलीकडील असल्याचा दावा करून पुन्हा शेअर करण्यात येत आहे.