Muslim Students Learning Sanskrit Video: लाइटहाऊस जर्नालिझमला विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडिओ शेअर होत असल्याचे आढळले, व्हिडिओमध्ये एक व्यक्ती विद्यार्थ्यांना संस्कृत शिकवताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना मंदिरात पुजारी म्हणून नोकरी मिळावी यासाठी मुस्लिम संस्था संस्कृत श्लोक शिकवत असल्याचा दावा या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये केला जात होता. नेमकं यामध्ये काही तथ्य आहे का हे जाणून घेऊया..
काय होत आहे व्हायरल?
फेसबुक युजर ‘सनातन धर्म रक्षक’ ज्यांचे 5.3K फॉलोवर आहे त्यांनी हा व्हिडिओ शेअर केला होता
अन्य यूजर्स देखील हा व्हिडीओ याच दाव्यासह शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडिओ डाउनलोड करून आणि नंतर InVid क्रोम एक्सटेंशन मध्ये अपलोड करून आमचा तपास सुरू केला. त्यानंतर आम्ही त्यातून मिळालेल्या किफ्रेम्स तपासल्या. या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करताना आम्हाला द इकॉनॉमिक टाइम्सवरील बातमी सापडली.
त्यात लिहिले होते की, मलिक दीनार इस्लामिक कॉम्प्लेक्स (MIC) द्वारे संचालित अकादमी ऑफ शरिया अँड ॲडव्हान्स्ड स्टडीज (ASAS) या संस्थेत अलीकडेच हिंदू विद्वानांच्या मदतीने आपल्या विद्यार्थ्यांना ‘देव भाषा’ म्हणून ओळखली जाणारी संस्कृत शिकवण्याचा उपक्रम राबवण्यात आला होता. या प्रयत्नातून एक एकतेचे एक उदाहरण तयार करण्याचा संस्थेचा प्रयत्न होता असेही सांगण्यात आले होते. प्राचीन आणि अभिजात भाषा शिकवण्यासाठी अभ्यासक्रम तयार करण्याचा निर्णय, विद्यार्थ्यांमध्ये इतर धर्मांबद्दलचे ज्ञान आणि जागरूकता निर्माण करण्यासाठी घेण्यात आला आहे, असे संस्थेने म्हटले होते.
त्यानंतर आम्ही Google कीवर्डसह शोध घेतला आणि केरळमधील इस्लामिक संस्थेत संस्कृत शिकवल्या जात असल्याच्या अनेक बातम्या आढळल्या.
आम्हाला या घटनेबद्दल व्हिडिओ बातम्यांचे अहवाल देखील सापडले
निष्कर्ष: केरळस्थित इस्लामिक इन्स्टिट्यूटमध्ये भगवद्गीता, संस्कृत शिकवल्या जात असल्याचा व्हिडिओ चुकीच्या दाव्यांसह शेअर केला जात आहे. मंदिरातील पुजारी बनण्यासाठी मुस्लिम विद्यार्थ्यांना संस्कृत शिकविले जात नाही.