Muslims Voters Given Money Claims: लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यासाठी ७ मे रोजी मतदान पार पडले. या कालावधीत लोकसभेच्या ९३ जागांवर मतदान झाले, त्यापैकी गुजरातमधील २५ जागा, कर्नाटकात १४ जागा, महाराष्ट्रात ११ जागा, उत्तर प्रदेशात १० जागा, मध्य प्रदेशात ९, छत्तीसगडमध्ये ७ आणि बिहार मधील ५ जागा आणि इतर अनेक राज्यांतील काही जागांचाही समावेश होता. या जागांवर एकूण ६२. १% मतदान झाले. मतदानाच्या दरम्यान, सोशल मीडियावर एक पत्र व्हायरल झाले होते, ज्यामध्ये दुबईच्या एका मुस्लिम संघटनेने लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या बाजूने मतदान करणाऱ्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर केल्याचे सांगितले गेले आहे. पत्रात मोबाईल क्रमांक आणि पत्ता सुद्धा नमूद करण्यात आल्याने पत्र खरेच असल्याचा दावा करण्यात येत होता. ज्यामुळे आणखीनच संभ्रम वाढला होता. न्यूजचेकरने या संदर्भात केलेल्या तपासात वेगळीच माहिती समोर आली आहे.

काय आहे दावा?

व्हायरल पत्राच्या शीर्षस्थानी “Association of Sunni Muslims” असे इंग्रजीत लिहिले आहे आणि त्याखाली त्याचे भाषांतरही हिंदी आणि इंग्रजीमध्ये आहे. याशिवाय, पत्ता आहे “#2-11th street, Khalid Bin Walid Road, Plot no. Umm Hurair One, Dubai, United Arab Emirates” आणि जारी करण्याची तारीख २९ एप्रिल २०२४ अशी लिहिली आहे.

Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
ishwar allah tero naam bhajan news
Protest on Bhajan: ‘ईश्वर अल्लाह तेरो नाम’ भजनावर आक्षेप घेत घोषणाबाजी; अटल बिहारी वाजपेयींच्या स्मृतीप्रित्यर्थ आयोजित कार्यक्रमात गोंधळ!
Pratap Sarnaik and vinod kambli
Vinod Kambli : “तुझा लिव्हर एकदम फ्रेश, बायकोशी किती भांडतोस”, सरनाईक यांचा विनोद कांबळीबरोबरचा मिश्किल संवाद व्हायरल!
Image Of Dhananjay Munde
Dhananjay Munde : “माझ्याजवळचा असला तरी सोडू नका”, संतोष देशमुख हत्येप्रकरणी धनंजय मुंडेंकडून फाशीची मागणी
Navri Mile Hitlarla
“तुला माझ्यासाठी…”, सुनांच्या हट्टासाठी एजेने दिली शिक्षा; लीलाचा आनंद मात्र गगनात मावेना, पाहा प्रोमो

पत्रातील इंग्रजी आणि उर्दू मजकुराच्या मराठी भाषांतरात असे लिहिले आहे की, “असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम (दुबई) ने ७ मे रोजी कर्नाटक आणि इतर राज्यांमध्ये भारतीय निवडणुकीत मतदान करणाऱ्या मुस्लिमांसाठी तिकीट बुकिंग आणि प्री-बुक केलेल्या तिकिटांचा संपूर्ण परतावा जाहीर केला आहे. आर्थिक मदत जाहीर केली आहे. या निवडणुकांमध्ये फॅसिस्ट शक्तींचा पराभव करून मुस्लिमांचा खरा मित्र असलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला पुन्हा सत्तेवर आणणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे.” याशिवाय पत्रात कर्नाटकातील हुबळी, कारवार आणि शिमोगा जिल्ह्यातील लोकांसाठी तीन वेगवेगळे मोबाईल क्रमांकही जारी करण्यात आले आहेत.

तपास:

व्हायरल दाव्याची चौकशी करण्यासाठी, न्यूजचेकरने सर्वप्रथम पत्रात उपस्थित असलेल्या मुस्लिम संघटनेचा शोध घेतला. यावेळी, आम्हाला इंटरनेटवर असोसिएशन ऑफ सुन्नी मुस्लिम ऑर्गनायझेशन ऑफ दुबईशी संबंधित कोणतीही माहिती मिळाली नाही.

यानंतर, न्यूजचेकर ने (newschecker.in) व्हायरल पत्रातील पत्त्याच्या मदतीने त्या संस्थेचा शोध घेतला आणि हा पत्ता संयुक्त अरब अमिरातीची राजधानी दुबई येथे असलेल्या पाकिस्तानी दूतावासाच्या मुख्यालयाचा असल्याचे आढळले.

व्हायरल पत्रात असलेले मोबाईल क्रमांकही बनावट आहेत. तपास पुढे नेत, आम्ही व्हायरल पत्रात उपस्थित असलेल्या क्रमांकांवर देखील संपर्क साधला. यावेळी, आम्ही व्हॉट्सॲपच्या मदतीने पत्राच्या शीर्षस्थानी असलेल्या क्रमांकावर संपर्क साधला, जो मोहम्मद फैयाज नावाच्या व्यक्तीचा होता. या वेळी आम्हाला आढळून आले की हा नंबर डॅलमायर या कॉफी मशीन विकणाऱ्या कंपनीच्या नावावर नोंदणीकृत आहे. यावेळी आम्हाला कंपनीचे इन्स्टाग्राम अकाउंटही सापडले. हा क्रमांक या खात्याच्या बायोमध्ये आहे, जो व्हायरल पत्रातही आहे.

यानंतर आम्ही त्या कंपनीशीही संपर्क साधला आणि त्यांनी आम्हाला स्पष्ट केले की, “आम्ही पत्रात नमूद केलेल्या संस्थेशी संबंधित नाही. या प्रकरणाशी आमचा काहीही संबंध नाही.” आमच्या तपासात, आम्ही व्हायरल पत्रात उपस्थित असलेल्या इतर दोन्ही क्रमांकांवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांचे उत्तर आल्यावर स्टोरी अपडेट केली जाईल.

हे ही वाचा << भारतातच राष्ट्रध्वजाचा इतका अपमान? पाकिस्तानचा संबंध जाणून नेटकरी आणखीनच भडकले, नेमकं ‘त्या’ रस्त्यावर घडलं काय?

निष्कर्ष: आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले की व्हायरल पत्र बनावट आहे, कारण पत्रात दावा केलेल्या संस्थेची माहिती इंटरनेटवर उपलब्ध नाही.

(ही कथा मूळतः न्यूजचेकरने प्रकाशित केली होती आणि शक्ती कलेक्टिव्हचा एक भाग म्हणून लोकसत्ता पुनर्प्रकाशित केली आहे.)

अनुवाद: अंकिता देशकर

Story img Loader