Iran Protest on Mahsa Amini Death : इराणमध्ये हिजाबविरोधी आंदोलनादरम्यान एका तरुणीने आपले मोकळे केस सोडल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. पोलीस कोठडीत असताना या तरूणीचा मृत्यू झाल्यानंतर देशभरातील महिला पेटून उठल्या. या तरूणीला गोळ्या घालून ठार मारण्यात आल्याच्या बातम्या देखील समोर येत आहेत. या तरूणीच्या अंत्यसंस्काराचा व्हिडीओ देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. यामध्ये तरूणीच्या कबरीवर ठेवलेल्या फोटोजवळ लोक रडताना दिसत आहेत. अहवालानुसार, त्याच्या पोटात, मानेवर, हृदयावर आणि हाताला गोळ्या लागल्या आहेत. इराणमध्ये गेल्या आठवड्यापासून निदर्शनांदरम्यान हिंसाचार सुरूच आहे.

या घटनेनंतर महिला आणि मुली रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. इराणमध्ये हिजाब घालण्याचा कडक कायदा असूनही अनेक ठिकाणी महिला हिजाब उतरवताना दिसत आहेत. काही ठिकाणी तर महिलांना आपले हिजाब जाळून टाकले आहेत. हिजाबविरोधी चळवळ संपूर्ण जगभर पसरली असताना आणखी एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये महिला आपले केस कापून टाकताना दिसत आहेत.

Crime NEws
कुवैतहून थेट मध्य प्रदेश गाठलं अन् मुलीवर लैंगिक शोषण करणाऱ्याचा घेतला जीव; मृत्यूचं गुढ उकलायला वडिलांनीच केली मदत!
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
case registered against person who stole jewellery of dead woman in kurla bus accident case
कुर्ला बस अपघात: मृत महिलेचे दागिने चोरणाऱ्याविरोधात अखेर गुन्हा दाखल
actress keerthy suresh married to boyfriend antony thattil
शुभमंगल सावधान! १५ वर्षांच्या रिलेशनशिपनंतर अभिनेत्री अडकली लग्नबंधनात, फोटो केले शेअर
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
US man reads with giant anaconda Snake shocking video Viral
बापरे! बिछान्यावर भल्यामोठ्या ॲनाकोंडा सापाला घेऊन झोपला अन्…; पाहा भयावह VIDEO
woman made saree from newspaper video viral
“अरे ही तर उर्फी जावेदपेक्षा खतरनाक”, तरुणीने चक्क न्यूज पेपरपासून बनवली साडी, Video पाहून लोक झाले शॉक
Crime case against a motorist, pune, motorist act bad with woman, pune news, pune latest news,
पुणे : महिलेशी अश्लील कृत्य करणाऱ्या मोटारचालकावर गुन्हा

आणखी वाचा : खरे अमिताभ बच्चन कोण सांगा? हा VIRAL VIDEO पाहून कोणीही गोंधळून जाईल!

इथे पाहा व्हायरल व्हिडीओ :

आणखी वाचा : घराच्या छतावर भूत फिरतंय? VIRAL VIDEO पाहून लोक घाबरले, अखेर सत्य काय?

महसा अमिनी या २२ वर्षीय महिलेला पोलिसांनी हिजाब नियमाचं पालन न करण्यावरून हटकलं. पोलिसांचं म्हणणं होतं की तिने हिजाब नीट घातला नव्हता. त्यानंतर पोलिसांनी तिला पकडून पोलीस व्हॅनमध्ये टाकल्याचंही प्रत्यक्षदर्शींनी पाहिलं. पोलीस कोठडीत असतानाच ती बेशुद्ध झाली आणि कोसळली. रुग्णालयात दाखल केल्यानंतर ती कोमात गेली आणि तीन दिवसांनी महसाचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्समध्ये मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगितले जात आहे. पण लोक म्हणतात पोलिसांनी तिला दंडुक्याने मारहाण केली होती, त्यामुळेच तिचा मृत्यू झाला. महसाच्या घरचे म्हणतात की ती निरोगी होती. महसाच्या मृत्यूनंतर इराणमध्ये हिजाब विरोधी आंदोलन आणखी भडकलंय.

आणखी वाचा : दुसरीतील विद्यार्थ्यांचा भेळ बनवतानाचा VIDEO VIRAL; तब्बल १० मिलियन व्ह्यूज

आणखी वाचा : विश्लेषण: रस्त्यावर उतरून महिलांनी स्वतःचे केस कापले, हिजाब जाळले; इराणमध्ये नेमकं घडतंय काय?

इराणी तरुणी महसा हिच्या मृत्यूनंतर इराणमध्ये ज्या पातळीवर आंदोलन सुरू आहे, त्याचा विचारही दूरवरच्या कोणत्याही अधिकार्‍याने केला नसेल. महसाच्या समर्थनार्थ महिला मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली होती की तिला नियंत्रणात आणण्यासाठी अक्षरशः सुरक्षा जवानांना गोळीबार करावा लागला. या निषेधाला अनोखे रूप देत अनेक महिलांनी केस कापण्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केले आहेत, जे खूप व्हायरल होत आहेत.

आणखी वाचा : मुंबईच्या मरीन ड्राईव्हवर तरूणांनी केला गरबा डान्स; आनंद महिंद्रा म्हणाले, “गुजरातमधून माझा विरोध…

आणखी वाचा : Navratri 2022 : माजी पालकमंत्री आदिती तटकरे यांचा गरबा डान्स; पाहा Viral Video

महसा अमिनी हिच्या मृतदेहावर इराणच्या कुर्दिस्तान प्रांतात असलेल्या साकेज या त्यांच्या मूळ गावी इस्लामिक रितीरिवाजांनुसार दफन विधी करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने लोक जमले होते, ज्यामध्ये अनेकांनी निदर्शनेही केली. त्यांना रोखण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली. महसा अमिनीचा मृत्यू आणि ही निदर्शने अशा वेळी होत आहेत जेव्हा इराणमध्ये महिलांवरील अत्याचाराच्या बातम्या वाढत आहेत. इस्लामिक ड्रेस कोडचे पालन न करणाऱ्या महिलांना सरकारी कार्यालये आणि बँकांमध्ये जाण्यापासून रोखले जात आहे. या वर्षाच्या सुरुवातीला महिलांना जाहिरातीत घेण्यावर सुद्धा बंदी करण्यात आली होती.

Story img Loader