काल पासून सोशल मीडियावर एका तरुण शिवप्रेमी व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. अवघ्या २२ सेकंदाच्या या व्हिडीओवर लोक भरभरून प्रेम करत आहेत. त्या व्हिडीओमध्ये दिसत असलेल्या तरुणाचं अवघ्या महाराष्ट्रातील जनता कौतुक करत आहे. असं काय आहे त्या व्हिडीओमध्ये जाणून घेऊयात…
व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ ट्राफिकमधला आहे. सिग्नलला गाडी थांबलेली असताना कोणीतरी मागून हा व्हिडीओ शूट केला आहे. पुढे थांबलेल्या कारच्या मागील काचेवर छत्रपती शिवाजी महाराजांचं स्टिकर लावलेलं आहे, ज्यावर धूळ आहे. ही धूळ पाहून एक शिवप्रेमी स्वतःजवळच्या एका कापडाने त्या स्टिकरवरची धूळ पुसतो. त्याची ही कृती मागील गाडीतील एका व्यक्तीने कैमेऱ्यात कैद केली आहे. पोस्टमध्ये केलेल्या दाव्यानुसार हा व्हिडीओ येरवडा च्या Phoenix Mall सिग्नल जवळचा आहे.
( हे ही वाचा: संतापलेल्या नवरदेवाच्या भावाने विवाह सोहळ्यात वाहिनीला मारायला केली सुरुवात; घटना कैमेऱ्यात कैद )
व्हिडीओला नेटीझन्सची पसंती
गणेश गायकवाड (Ganeaysh Gaikwad ) या नावाच्या फेसबुक युजरने हा व्हिडीओ शेअर केला आहे. त्याने “राजे चा आदर……मानाचा मुजरा या भावाला…..!” अशी कॅप्शन देत हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत १७८ हजाराहून जास्त लोकांनी बघितलं आहे. तर यावर अनेकांनी कमेंट्सही केल्या आहेत.
( हे ही वाचा: डीजेचा आवाज ऐकून नवरदेव झाला बेभान, वऱ्हाडी मंडळी बघतच बसले; बघा Viral Video )
( हे ही वाचा: लहान मुलगी खेळतेय अवाढव्य सापाशी; हा Viral Video एकदा बघाच! )
नेटीझन्सकडून तरुणाचं कौतुक
नेटीझन्सने व्हिडीओवर कमेंट्स करत तरुणाचं कौतुक केलं आहे. एक वापरकर्ता लिहतो की “हा खरा मावळा महाराजांचा. मित्रा तुला शत शत नमन.” तर दुसऱ्या वापरकर्ता लिहतो की “जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे!! सलाम भावा” अशा शब्दात कौतुक केलं आहे. तर अनेकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्टिकरची काळजी घेता येत नसेल तर लावू नये असं स्पष्ट मत व्यक्त केलं आहे.