बंगरुळूमध्ये घरांच्या किंमतीमध्ये मोठी वाढ होत आहे अशात घरभाड्याने राहणे अवघड झाले आहे. बंगळुरू असे शहर आहे जिथे व्यवसाय आणि राजकीय घडमोडींपेक्षा तेथील प्रचंड वाहतूक कोंडी आणि घरमालक-भाडेकरूंच्या किस्से यांमुळेच जास्त चर्चेत असते. सध्या एका व्यक्तीने एका फ्लॅटचा व्हिडिओ पोस्ट केला आहे ज्याचे भाडे महिन्याला तब्बल २५हजार रुपये आहे. . व्हिडीओमध्ये त्याने रुम कशी आहे हे दाखवले आहे . अनेकांना वाटेल की २५ हजार रुपये भाडे म्हणजे एखादा १ बीएचके तर नक्कीच पण असे काहीच नाही पण तुमचा हा अंदाज चुकीचा आहे कारण अनेकांच्या मते – तो फ्लॅट फ्लॅट नव्हताच. खरं तर, तो ‘रूम’ होता – तोही इतका लहान होता.
हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर ‘अभिषेक सिंग’ या हँडलवरून शेअर करण्यात आला होता. ही पोस्ट एक दिवसापूर्वी शेअर करण्यात आली होती आणि त्यावर अनेक प्रतिक्रिया आल्या होत्या.
इतका छोटा फ्लॅट अन् भाडे २५ हजार रुपये
व्हिडीओमध्ये दिसते की एक व्यक्ती ही रुम कशी आहे दाखवतो त्यासाठी आधी हवेत दोन्ही बाजुला हात पसरवतो. एका भिंतीला एक लावतो आणि दुसरा हात दुसऱ्या भिंतीला लावतो. त्याच्या दोन्ही हात पसरल्यानंतर मावेल इतकीच दोन्ही भिंतीमध्ये जागा शिल्लक आहे. तसेच तो आयताकृती दिसणाऱ्या रुमच्या एका भितींला हात लावतो आणि दुसर्या भिंतीला पाय लावतो. त्याच्या एका हातापासून पायापर्यंत हवेत पसरल्यानंतर जितकी जागा उरेल तितकी त्याती लांबी आहे. त्यानंतर तो सांगतो की हा रुम बीआर आहे म्हणजेच बाल्कनी रुम. तो दार उघडून बाल्कनी दाखवतो जिथे इतकी कमी जागा आहे की एक किंवा दोन व्यक्तीच उभे राहू शकतात. रुममध्ये एक छोटा बेड ठेवला आहे ज्यावर एकावेळी एक व्यक्तीच झोपू शकतो असे तो सांगतो. तसे बेड समोर एक टेबल आहे. दोन्हीच्या मध्ये एक व्यक्ती उभा राहू शकेल इतकीच जागा शिल्लक आहे. त्यानंतर पोटमाळा दिसत आहे जिथे सामानाच्या बॅग देखील आहेत. भिंतीला एक पंखा लावलेला आहे. दरवाज्याला कपडे अडवलेले आहे. बास एवढेच सामान या खोलीत आहे आणि या खोलीचे भाडे तब्बल २५ हजार रुपये आहे.
हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर लगेच व्हायरल झाला, ज्यामुळे लोकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. बहुतेक लोकांना फ्लॅटबद्दल अनादर व्यक्त केला आहे असे वाटले, तर काहींना भाडे जास्त आहे आणि खोलीच्या लहान आकारापासून धक्का बसला. काहींनी शहरातील भाडे संस्कृतीवर टीका केली आणि ती भारतातील आयटी हबमधील सर्वात मोठ्या समस्यांपैकी एक असल्याचे म्हटले. . “ती जागा बाल्कनी नाही, ती जागा अशी आहे जिथे सिगारेट ओढायला जातात,” एका वापरकर्त्याने म्हटले.
“मुंबईही वेगळी नाही आणि पुणेही त्याच दिशेने जात आहे. जर हे असेच चालू राहिले – जसे आपल्या लोकसंख्येत – तर भारतातील सर्व शहरांची हीच परिस्थिती होईल,” तिसऱ्या व्यक्तीने जोडले.
“या खोलीत बाथरूम आणि स्वयंपाकघर कुठे आहे,” दुसऱ्याने विचारले.
बेंगळुरूमधील एका ‘छोट्या’ अपार्टमेंटचे भाडे जास्त असल्याने सोशल मीडियावर व्हायरल होण्याची ही पहिलीच वेळ नाही, कारण इंटरनेटवर असे अनेक फ्लॅट्स पाहिले आहेत जे फ्लॅटच्या नावाखाली ‘खोली’ देखील नव्हते.