रोहिंग्या मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या म्यानमारमधील सौंदर्यवतीचा किताब काढून घेण्यात आला आहे. म्यानमारची ‘ब्युटी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी श्वे यान शी हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रोहिंग्या मुस्लिमांविरोधात एक व्हिडिओ अपलोड केला होता. रोहिंग्या मुस्लिम हे माध्यमांचा वापर करून जगाची दिशाभूल करत आहेत. आपण शरणार्थी आहोत असं ते जगाला भासवत आहेत पण सत्यपरिस्थिती काही वेगळी आहे असं सांगत तिने रोहिंग्या मुस्लिमांवर आरोप केले. तिच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. श्वे यान शीच्या असंवेदनशील वागण्यामुळे सौंदर्य स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्थेने तिचा किताब काढून घेतला. बेजबाबदारपणे वागून तिने सौंदर्य स्पर्धेचे नियम मोडले आहेत, असं सांगत तिचा ‘मिस म्यानमार’चा किताब काढून घेण्यात आला.
प्रेरणादायी! IITमधील नोकरी सोडून अवलियाचे आदिवासी पाड्यात काम!
ऑगस्ट महिन्यांपासून म्यानमारमध्ये रोहिंग्या मुस्लिमांचे प्रश्न ऐरणीवर आला आहे. लाखो लोकांनी छळाला कंटाळून शेजारच्या देशांत आश्रय घेतला. म्यानमारमधील रखीन प्रातांत रोहिंग्यांची वस्ती आहे. पण शुद्धीकरणाच्या नावाखील म्यानमारमध्ये रोहिंग्यांच्या कत्तली केल्याचं समोर आलं. सरकारने दिलेला बेकायदा स्थलांतरितांचा दर्जा, बौद्ध बहुसंख्याकांकडून मिळणारी वाईट वागणूक, हिंसा यातून जीव वाचवण्यासाठी लाखो मुस्लिमांनी बांगलादेशमध्ये आश्रय घेतला आहे. आतापर्यंत ३ लाख ७७ हजार रोहिंग्या मुस्लिमाने बांगलादेश सीमेवर असलेल्या छावण्यांत आश्रय घेतला. काही जणांचा वाटेतच अन्नपाण्या वाचून आणि आजारपणामुळे मृत्यू झाला.
जगभरात या प्रश्नावरून म्यानमार सरकारवर टीका होत आहे, हा संवेदशनील विषय असतानादेखील श्वे यान शीने मनात खदखदत असलेल्या तिरस्कारामुळे व्हिडिओद्वारे रोहिंग्यावर आरोप केले. पण या आरोपामुळे तिला ज्या किताबामुळे जगभरात ओळख मिळाली तो मात्र गमवावा लागला.