रोहिंग्या मुस्लिमांविरोधात आक्षेपार्ह व्हिडिओ अपलोड करणाऱ्या म्यानमारमधील सौंदर्यवतीचा किताब काढून घेण्यात आला आहे. म्यानमारची ‘ब्युटी क्वीन’ म्हणून ओळखली जाणारी श्वे यान शी हिने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर रोहिंग्या मुस्लिमांविरोधात एक व्हिडिओ अपलोड केला होता. रोहिंग्या मुस्लिम हे माध्यमांचा वापर करून जगाची दिशाभूल करत आहेत. आपण शरणार्थी आहोत असं ते जगाला भासवत आहेत पण सत्यपरिस्थिती काही वेगळी आहे असं सांगत तिने रोहिंग्या मुस्लिमांवर आरोप केले. तिच्या या आरोपानंतर सोशल मीडियावर तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. श्वे यान शीच्या असंवेदनशील वागण्यामुळे सौंदर्य स्पर्धा आयोजित करणाऱ्या संस्थेने तिचा किताब काढून घेतला. बेजबाबदारपणे वागून तिने सौंदर्य स्पर्धेचे नियम मोडले आहेत, असं सांगत तिचा ‘मिस म्यानमार’चा किताब काढून घेण्यात आला.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा