एका छोट्या पक्ष्याला प्लास्टिकच्या पिशवीतून सोडवत असलेल्या एका व्हिडीओने ट्विटर नेटिझन्सचे लक्ष वेधून घेतले आहे. त्या व्हिडीओमध्ये पक्ष्याच्या डोक्यावर प्लास्टिकचं रॅपर अडकलेलं दिसून येत आहे. अफरोज शाह या ट्विटर युजरने हा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये हा मैना पक्षी असल्याचं लिहल आहे. अफरोज शाह यांच्या कॅप्शननुसार हा व्हिडीओ संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातला आहे. प्लास्टिक कचऱ्यामुळे पक्षांना, प्राण्यांना होणारा त्रास त्या व्हिडीओमध्ये बघून तुम्हाला अस्वस्थ करू शकतो.
“एक मैना पक्षी जंगलात स्नॅक्स पॅकेट- सिंगल-यूज मल्टी लेयर पॅकेजिंग (एमएलपी)मध्ये अडकलेला आहे. उत्पादन, खरेदी, खाणे आणि कचरा असं आपलं सुरु आहे. आमच्या स्वयंसेवकाने संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अडकलेलं प्लास्टिक काढून मुक्त केले. या असहाय्य प्रजाती जगण्यासाठी लढा देतात. ” असं कॅप्शन अफरोज शाह यांनी व्हिडीओ पोस्ट करताना लिहल आहे. व्हिडीओमध्ये पक्षी डोक्याच्यावर पॅकेट घेऊन भटकत असल्याचे दिसून येते. क्लिप चालू असताना, एक स्वयंसेवक येतो आणि पॅकेट काढून घेतो, त्यानंतर पक्षी लगेच उडतो.
नेटीझन्सकडून संताप व्यक्त
“१९ ऑगस्ट रोजी शेअर केलेल्या या व्हिडीओला १३,६०० हून अधिक लोकांनी पहिले आहे. अनेकांनी आपली प्रतिक्रियाही नोंदवली आहे. लोकांनी प्लास्टिक कचरा करण्याबद्दल आपला संताप व्यक्त केला आणि लिहिले की प्लास्टिक प्रदूषणापासून पक्षी आणि प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदे कसे लागू केले जावेत. अनेकांनी शाह आणि स्वयंसेवकांचे पक्ष्याला मदत केल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
कौतुकाची थाप
“चांगलं काम, देव तुम्हाला आणि तुमच्या स्वयंसेवकांना आशीर्वाद देवो” एक ट्विटर वापरकर्त्याने लिहिले. “पक्षी आणि प्राण्यांवरील प्लास्टिक प्रदूषणाचे हे जिवंत उदाहरण आहे. आता प्लास्टिक प्रदूषणाविरोधात भूमिका घेण्याची वेळ आली आहे ”दुसर्याने टिप्पणी केली. “प्लास्टिक पिशव्या आणि पॅकेजिंग यापासून पक्ष्यांना धोका आहे. फक्त कठोर दंडच कचरा टाकणे थांबवू शकतात ”तिसरा वापरकर्ता लिहतो.
A Myna bird – in a forest- trapped in a snacks packet – single use multi layer packaging (MLP ).
Produce, Buy , Eat and litter .
Our volunteer freed it in the SGNP forest.
And then these hapless species fight to live on.@RandeepHooda @UNEP @PoojaB1972 pic.twitter.com/WPXl6kupIE
— Afroz shah (@AfrozShah1) August 19, 2021
या व्हिडिओबद्दल तुमचे काय मत आहे? “