बॉलीवूड सुपरस्टार आणि सदाबहार अभिनेत्री रेखा नेहमीच आपल्या लूक आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. सध्या या अभिनेत्रींने एक फोटोशूटमुळे चर्चेत आली आहे ज्यामध्ये ती बार्बी लूकमध्ये फार गोड दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दिग्गज अभिनेत्रीने तिच्या वोग अरेबिया (Vogue Arabia) बरोबरच्या फोटोशूटमधील काही फोटो ३ जुलै रोजी शेअर केले होते. या फोटोशूटची इंटरनेटवर तुफान चर्चा झाली. रेखाने या प्रकल्पासाठी फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राबरोबर कोलॅबोरेट केले होते. अभिनेत्रीने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिच्या फॅशनबद्दलच्या प्रेमाबद्दल अनेकदा सांगितले आहे आणि आता आर्टफिशिअल इंटेलिजेन्सच्या मदतीने तयार केलेले अभिनेत्रींचे काही फोटो समोर आले आहेत.

हेही वाचा – किसिंग आणि भांडणानंतर आता दिल्ली मेट्रोत दोन तरुणींनी केला ‘पोल डान्स’; Video पाहून लोक म्हणाले…

अभिनेत्री रेखाचा बार्बी लूक

ई-शॉपिंग प्लॅटफॉर्म Myntra ने ट्विटरवर एक असे कोलॅबोरेशन शेअर केले आहे ज्याची तुम्ही कधी कल्पना देखील केली नसेल. जर अभिनेत्री रेखा बार्बी असती तर कशी दिसली असती? या कल्पनेवेर आधारित काही एआय फोटो पाहून तुम्हाला नक्कीच आश्चर्य वाटेल. हे फोटो शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहले आहे की, ”आम्ही एआयला रेखाला बार्बीच्या रुपात पुन्हा कल्पना करण्यास सांगितले”

पोस्ट ११ हजारपेक्षा जास्त वेळा शेअर केली गेले आहे आणि त्यावर खूप प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. लोक रेखाचे बार्बीच्या रुपातील एआय फोटो पाहून मंत्रमुग्ध झाले आहे. काहींनी फोटो पाहून लिहिले की, ”रेखा बार्बीसाठी योग्य आहे. किंबहुना, ती या लोकप्रिय व्यक्तिरेखेला देशी टच देऊ शकते. तुम्ही देखील अभिनेत्री रेखाचे हे बार्बी लूकमधील फोटो पाहून तिच्या प्रेमात पडाल.

हेही वाचा – मुंबई लोकलमध्ये काकांनी गायले ‘कांटा लगा’, प्रवाशांनी मारले ठुमके; पाहा मजेशीर व्हिडीओ

बार्बी चित्रपट येणार प्रदर्शित

बार्बी २१ जुलै २०२३ रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. या चित्रपटात मार्गोट रॉबी आणि रायन गोस्लिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत आणि ग्रेटा गेर्विग दिग्दर्शित आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Myntra shares ai images of rekha as barbie internet is star struck snk