Ganesh Temple Viral Video: भारतामध्ये असे अनेक मंदिर आहेत जे आपल्या वैशिष्ट्य़ आणि रहस्यात्मक कारणांमुळे ओळखले जातात. असेच एक गणेश मंदीर सध्या चर्चेत आले आहे. हे मंदीर घनदाट जंगलामध्ये उंच डोंकरावर उभारलेला आहे. सोशल मीडियावर गौरी गणेश महाराज मंदिराचे व्हिडीओ व्हायरल होच आहे. व्हिडीओला लाखो लोकांची पसंती मिळते आहे पण हे मंदिर आहे कुठे?

सोशल मीडिया फ्लॅटफॉर्म इंस्टाग्राम हा व्हिडीओ Indian.travellers नावाच्या अकाउंटवर शेअर केला आहे. हे मंदिर छत्तीसगडच्या ढोलकल डोंगरावर स्थित आहे. भक्तांसाठी हे मंदिर अत्यंत खास आहे. येथे वर्षभर भाविकांची वर्दळ असते, असे सांगितले जाते. अंदाजे १ हजार वर्षे जुने हे गणेशजी मंदिर समुद्रसपाटीपासून ३ हजार फूट उंचीवर असल्याचे सांगितले जात आहे.

16 kg gold saree, Mahalakshmi Devi Pune,
पुणे : श्री महालक्ष्मी देवीला १६ किलो सोन्याची साडी परिधान
18th October 2024 Horoscope In Marathi
१८ ऑक्टोबर पंचांग: नोकरदारांच्या कुंडलीत अच्छे दिन तर…
Leopard Nate area, Ratnagiri, Leopard, loksatta news,
रत्नागिरी : नाटे परिसरात दिवसाढवळ्या बिबट्याची दहशत, विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढण्यात वन विभागाला यश
nisarg lipi aquatic plants
निसर्गलिपी: पाणवनस्पतींची दुनिया
Loksatta kutuhal Cloudburst forecast Orographic lift Climate change
कुतूहल: ढगफुटीचा अंदाज
Ramdara Mandir 50 km away from pune
पुण्यापासून फक्त ५० किमीवर असलेले हे सुंदर मंदिर पाहिले आहे का? VIDEO एकदा पाहाच
rajas lotus
राजस कमळ
pune video : Ghoradeshwar Temple
पुण्यापासून फक्त एका तासाच्या अंतरावर असलेले हे सुंदर घोराडेश्वर मंदिर पाहिले आहे का?

येथे व्हिडिओ पहा
विशेष म्हणजे येथे असलेली गणेशाची मूर्ती ढोलाच्या आकाराची आहे. त्यामुळेच या टेकडीला ढोलकल टेकडी आणि ढोलकल गणपती असे म्हणतात. मूर्तीमध्ये श्रीगणेशाने उजव्या हातात कुऱ्हाड आणि डाव्या हातात तुटलेला दात आहे. त्याच्या उजव्या हातात जपमाळ आणि डाव्या हातात मोदक आहे. ५ दिवसांपूर्वी शेअर केलेल्या या व्हिडिओला २७ हजारांहून अधिक लोकांनी पंसती दर्शवली आहे.

व्हिडिओ शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, ‘गणेशाची ही अनोखी मूर्ती छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे ढोलकल पर्वतावर सुमारे ३००० फूट उंचीवर आहे. ही मूर्ती ११ व्या शतकात कोरली आणि स्थापित केली गेली आणि त्याची नियमितपणे पूजा केली जात होती, परंतु कालांतराने ती लोकांच्या स्मरणातून बाहेर पडली आणि झाडांनी झाकली गेली आणि अनेक वर्षे लपून राहिली, जोपर्यंत बौलाडिला खाणींपर्यंत ब्रिटीशांनी त्याचा पुन्हा शोध लावला नाही. १९४३ मध्ये उघडले. सुमारे ३ फूट उंचीची ही मूर्ती ५०० किलोपेक्षा जास्त वजनाची आहे. छत्तीसगढच्या दंतेवाडा प्रदेशात बस्तरच्या खोल, अभेद्य जंगलांमध्ये ग्रॅनाइट खडकामध्ये कोरलेली गणेशाची मूर्ती एका सुंदर गोलाकार तळ्यावर वसलेली आहे.’