Indo Myanmar Border Viral Video : तेमजेन इम्ना अलॉन्ग ट्वीटरवर नेहमीच सक्रीय असतात आणि नेहमीच नागालॅंडचं कौतुक करत येथील फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असतात. ११ जानेवारीला मंत्र्यांनी ट्विटरवर आणखी एक जबरदस्त व्हिडीओ शेअर केला आहे. त्यांनी लोंगवा गावाची एक क्लिप शेअर केलीय. नागालॅंडच्या मोन जिल्ह्यातील सर्वात मोठ्या गावांपैकी एक असलेल्या लोगंवा गावाचा व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या गावाची खासीयत काय आहे, याबद्दल तुम्ही नक्कीच विचार करत असाल. हे गाव भारत म्यानमार सीमेजवळ आहे. लोंगवा गावात कोन्याक नागा जमातीचे लोक राहतात. येथील लोकांना दुहेरी नागरिकत्वाची परवानगी देण्यात आलीय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागालॅंडच्या मंत्र्यांनी या गावाचा व्हिडीओ शेअर करत आश्यर्य व्यक्त केलं, म्हणाले…

अनघच्या घराच्या वेगळ्या स्थानामुळं, झोपण्याची जागा भारतात आणि स्वयंपाक घर म्यानमारमध्ये येतो. इम्ना अलॉन्ग यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अनघच्या घराला दाखवण्यात आलं आहे. त्यांनी पोस्ट शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलं, “ओएमजी, हा माझा भारत देश आहे, सीमा ओलांडण्यासाठी या लोकांना फक्त त्यांच्या बेडरुममध्ये जाण्याची गरज आहे. भारतात झोपायचं आणि म्यानमारमध्ये खायचं, अशीच या गावाची परिस्थिती आहे.

नक्की वाचा – नवऱ्याला पाहून नवरी लाजली, वेडिंग शूटचा Video व्हायरल, नेटकरी म्हणाले, “सरकारी नोकरीची ताकद”

इथे पाहा व्हिडीओ

इम्ना अलॉन्ग यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. इंटरनेटवर तुफान व्हायरल झालेल्या या व्हिडीओनं अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षावही केला आहे. एका नेटकऱ्याने प्रतिक्रिया देत म्हटलं, ओएमजी, मला हे कधीच माहित नव्हतं. एका अन्य नेटकऱ्याने म्हटलं, “कमाल आहे”. या गावाचा व्हिडीओ पाहून सर्वांनाचा आश्चर्याचा धक्का बसला आहे. नेटकरीही या व्हिडीओला भन्नाट प्रतिक्रियांचा वर्षाव करताना दिसत आहेत. इंटरनेटच्या जगात या गावाची तुफान चर्चा रंगताना दिसत आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaland longwa villagers sleeps in india eats in myanmar minister temjen imna along shares video on twitter people stunned nss