नागालँडचे मंत्री तेमजेन इमना हे सोशल मीडियावर नेहमी चर्चेत असतात. आपल्या चाहत्यांसाठी ते सतत काही ना काही पोस्ट करतात असतात. नुकताच त्यांनी एक व्हिडीओ शेअर केला आहे ज्याने सर्वांच लक्ष वेधून घेतले आहे. एका स्थानिक खाद्य पदार्थ विक्रेत्याच्या किचनमध्ये अंडा चिकन रोल तयार करताना दिसत आहे. तेमजेन यांनी यांचा हा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. लोकांना त्यांचे हे रुप पाहायला आवडत आहे.
नागालँडचे उच्च शिक्षण मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी त्यांचा स्वंयपाक करतानाचा व्हिडीओने पुन्हा एकदा सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
आपल्या विनोदी आणि हटके शैलीमुळे सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या तेमेजन यांनी अलीकडेच एक व्हिडिओ शेअर केला तो पाहून खाद्यप्रेमींच्या तोंडालाही पाणी सुटेल. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्वरीत व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये तेमजेन स्थानिक भोजनालयात शेफ म्हणून काम करताना दिसले.
हेही वाचा – कशी केली जाते रेल्वेच्या डब्यांची सफाई? मध्य रेल्वेने पोस्ट केलेला व्हिडीओ होतोय व्हायरल
व्हिडीओमध्ये अलॉन्ग हे अगदी कौशल्याने पराठा बनवताना दिसत आहे. तव्यावर पराठा भाजत ते स्टीलच्या कपमध्ये अंडी फेटून घेतात आणि रोलसाठी तयार केलेले अंड्याचे मिश्रण पराठ्यावर टाकतात. झटपट भाजून घेऊ ते पराठा कुरकुरीत असल्याची खात्री करतात. स्वयंपाकघरातील एक कर्मचारी सदस्य ऑम्लेट पराठ्याला ताजा चिरलेला कांदा, चिकन तुकडे आणि सॉस घालण्याचे काम हाती घेतो. शेजारी स्टोव्हवर गरमा गरम चहा तयार होत असल्याची दिसते. त्यानंतर तयार ऑम्लेट चिकन रोलचा आस्वाद घेताना अलॉन्ग दिसत आहे.
हेही वाचा – परदेशी निघालेल्या आईचा निरोप घेताना भावूक झाली जुळी लेकरं; व्हायरल व्हिडीओ पाहून तुमच्या डोळ्यात येतील अश्रू
व्हिडीओ शेअर करताना आपल्या खोडकर शैलीमध्ये अलॉन्ग यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे, “खरं सांगा, तुम्हालाही खाण्याची इच्छा झाली ना? पण मी व्हर्च्युअल मोडमध्ये खायला देऊ शकणार नाही, जर तुम्ही इथे असता तर काहीतरी करता आले असते.”
व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधले आहे आणि आतापर्यंत १४ लाखांपेक्षा जास्त वेळा हा व्हिडीओ पाहिला आहे.
याव्यतिरिक्त तेमजन अलॉन्ग ‘हॉर्नबिल फेस्टिव्हल’च्या (Hornbill Festival) माध्यमातून नागालँडच्या सांस्कृतिक वैभवाला सक्रियपणे प्रोत्साहन देत आहेत. हॉर्नबिल फेस्टिव्हल’च्या (Hornbill Festival) हा एक वार्षिक कार्यक्रम आहे ज्याला सहसा ‘उत्सवांचा उत्सव’ (‘Festival of Festivals०) म्हणून संबोधले जाते, हा नागा वारशाचा उत्सव (Naga heritage) आहे, ज्यामध्ये लोकनृत्य, पारंपारिक संगीत आणि स्थानिक पाककृती आहेत.