नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग यांनी भारताच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीच्या वारशाची झलक दाखवणारा एक व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओमध्ये एक महिला पारंपारिकपद्धतीने जात्यावर गहू दळत आहे, एक हाताने दगडी जात्यामध्ये धान्य टाकत आहे अन् दुसऱ्या हाताने पीठ दळत आहे. जाते आणि जात्यावर धान्य दळून त्याचे पीठ तयार करणे हे कित्येक शतकांपासून भारतीय स्वयंपाकघरांचा भाग आहे. पण या व्हिडीओमध्ये बॉलीवूडमध्ये अभिनेत्री देखील दिसत आहे. व्हिडीओमध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी देखील दिसत आहे. विशेष म्हणजे शिल्पा शेट्टीने जात्यावर चक्क गहू दळताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असणाऱ्या नागालँडच्या इम्ना अलाँग यांना हा व्हिडीओ आवडला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ शेअर करत त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले की, “चक्की दा आटा, मक्के की रोटी, सरसों दा साग. वाह जी वाह!”

हेही वाचा – Zeptoवरून मागवलेल्या संत्र्यामध्ये व्यक्तीला सापडली जिवंत अळी! पाहा, कपंनीने मागितली माफी

पूर्वीच्या काळात ही पद्धत वापरली जात होती आणि व्यायामाची एक चांगली पद्धत होती. हा व्हिडीओ लोकांना प्रचंड आवडला आहे. अनेकांनी कमेंट करत सोशल मीडियावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

“हे त्या दिवसातील सर्वोत्तम व्यायामापैकी एक होते. माझ्या आजीकडे ते होते आणि ती ते नियमितपणे वापरत असे आणि मी अगदी लहान असताना ते फक्त मनोरंजनासाठी करायचो. यासाठी खूप ताकद आणि सहनशक्ती लागते आणि अतिशय जलद आणि अगदी सहजतेने तिने ते केले.,” असे एकाने लिहिले.

हेही वाचा – “मी मोसंबी, मी नारंगी”, गुरु शिष्याच्या जोडीने सादर केली ठसकेबाज लावणी; Viral Video एकदा बघाच

तिच्या फिटनेससाठी ओळखल्या जाणाऱ्या शिल्पा शेट्टीने तिच्या राजस्थानच्या प्रवासातील संस्मरणीय क्षण इन्स्टाग्रामवर शेअर केला. व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये शिल्पाने लिहिले की, माझ्या नुकत्याच झालेल्या राजस्थान भेटीत, जेव्हा मी एक जाते पाहिली तेव्हा मला कळले की मला ते वापरून पाहायचे आहे आणि, अरे देवा! काय ही कसरत! जात्यावर धान्य दळण्यामुळे हात मजबूत होतात, पचनक्रिया सुधारते, पुनरुत्पादक अवयवांना चालना मिळते आणि पाठीच्या आणि हॅमस्ट्रिंग स्नायूंची लवचिकता वाढते यात काही आश्चर्य नाही. (तुमच्या उगमाशी जाऊन प्रत्यक्ष जात्यावर काम केल्यानंतर तुम्हाला ते नियमितपणे वापरणाऱ्या लोकांबद्दल खूप आदर वाटतो.) जर तुम्हाला पाठदुखी असेल, स्लिप-डिस्कचा त्रास होत असेल आणि गर्भधारणेदरम्यान या आसनाचा सराव करणे टाळा. तुम्ही यापूर्वी कधी जात्यावर धान्य दळले आहे का?”

हेही वाचा – पुण्यातील व्यक्तीला वॉटर प्युरिफायरमध्ये सापडल्या ‘लाल अळ्या’, व्हायरल व्हिडिओ पाहून संतापले पुणेकर

व्हिडीओमध्ये शिल्पाने तिच्या चाहत्यांना जात्यावर गहू दळण्याची पारंपारिक पद्धत दाखवली आहे ज्याला स्थानिक पातळीवर ‘चक्कीचे आटा’ म्हणून ओळखले जाते.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaland minister shares video of shilpa shetty grinding grains on atta chakki snk