Nagaland Minister Temjen Imna Along Shared Nature Video : नागालॅंडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग सोशल मीडियावर नेहमीच सक्रीय असतात. ते नेहमीच निसर्गाचे सुंदर व्हिडीओ आणि फोटो इंटरनेटवर शेअर करत असतात. नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेण्यात ते माहिर आहेत. त्यांच्या पोस्ट सोशल मीडियावर आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतात. आताही त्यांनी निसर्गाच्या कुशीत लपलेलं सौंदर्य एका व्हिडीओच्या माध्यमातून जगासमोर आणलं आहे. व्हिडीओ शेअर करत तेमजेन यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय, ‘डोंग वॅली…भारताचा पहिला सुर्योदय.’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

तेमजेन यांनी शेअर केलेल्या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, डोंग वॅलीत सुंदर रस्ते निसर्ग सौंदर्याच्या कुशीत लपले आहेत. डोंगर कड्यावर धुक्याची चादर पसरलीय. हिरव्यागार झाडीत गुलाबी थंडी पसरल्याने स्थानिक नागरीक येथील निसर्गाचा आनंद लुटताना दिसत आहेत. अरुणाचल प्रदेशातील डोंग वॅलीच मनमोहक दृष्य कॅमेरात कैद झालं असून तेमजेन यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंटवर हा जबरदस्त व्हिडीओ शेअर केलाय. निसर्गाचा हा सुंदर व्हिडीओ तमाम नेटकऱ्यांची मन जिंकत असून तुफान व्हायरल होत आहे.

इथे पाहा निसर्गाचा सुंदर व्हिडीओ

ट्वीटरवर हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक लोकांनी या व्हिडीओला सुंदर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे. व्हिडीओ पाहिल्यानंतर एका यूजरने प्रतिक्रिया देत म्हटलंय, सर, आता मी उत्तर-पूर्वच्या यात्रेत आहे. हे एक स्वर्गासारखं सुंदर महल आहे. दुसऱ्या यूजरने म्हटलं, या सुंदर ठिकाणी मला एकदा तरी यायचं आहे. कारण मी या ठिकाणाचा खूप मोठा चाहता आहे.