आपल्या जीवनात शिक्षण आणि शिक्षकांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. विद्यार्थ्यांचे पालक शिक्षकांवर विश्वास ठेवून, त्यांच्या मुलांना शाळेत पाठवतात; तर विद्यार्थ्यांमधील कला, आवड आणि त्यांची क्षमता ओळखून शिक्षक नेहमीच मुलांना घडवीत असतात. तसेच त्यांना सोप्या पद्धतीनं कसं शिकवता येईल याचीसुद्धा काळजी घेत असतात. आज सोशल मीडियावरसुद्धा असंच काहीसं पाहायला मिळालं आहे. एक शिक्षिका विद्यार्थ्यांना एका अनोख्या पद्धतीनं भाज्यांची नावं शिकवताना दिसून आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिक्षक अनेकदा फळ्यावर चित्र काढून किंवा पुस्तकातील वस्तूचं चित्र दाखवून, ती वस्तू विद्यार्थ्यांना ओळखण्यास सांगतात. पण, एका शिक्षिकेनं भाज्यांची नावं मुलांच्या लक्षात राहावीत म्हणून एक अनोखी युक्ती शोधून काढली. व्हायरल झालेला व्हिडीओ एका शाळेतील आहे. शिक्षिकेनं प्रत्येक मुलाच्या बाकावर बाजारातील काही खऱ्या भाज्या ठेवल्या आहेत. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याच्या जवळ जाऊन, ती त्याच्यासमोर ठेवलेल्या भाज्या कोणकोणत्या आहेत, असं विचारताना दिसते आहे आणि विद्यार्थीदेखील भाज्यांची नावं अचूक सांगताना दिसत आहेत. शिक्षिकेची शिकवण्याची ही अनोखी पद्धत एकदा तुम्हीसुद्धा व्हायरल व्हिडीओतून पाहा.

हेही वाचा…“आयुष्य मनमुराद जगता आलं पाहिजे!” निरासग चिमुकल्यांनी घेतला भिजण्याचा आनंद; घरात केले पाणीच पाणी

पोस्ट नक्की बघा :

व्हिडीओत तुम्ही पाहिलं असेल की, कोबी, गाजर, बटाटा, दुधी आदी अनेक भाज्या विद्यार्थ्यांसमोर ठेवलेल्या आहेत आणि शिक्षिका त्यांना ओळखण्यास सांगते आहे. हा व्हिडीओ पाहून नागालँडचे उच्च शिक्षणमंत्री तेमजेन इम्ना यांनी सोशल मीडियावर शेअर केला आणि ‘प्रत्येक शाळेत अशी शिक्षण व्यवस्था आणि शाळेतील प्रत्येक शिक्षक असा असावा’, अशी कॅप्शन त्यांनी या पोस्टला दिली आहे.

नागालँडचे उच्च शिक्षणमंत्री तेमजेन इम्ना नेहमीच सोशल मीडियावर खास गोष्टी शेअर करीत अनेकांचं लक्ष वेधून घेत असतात; मग ते वडापाव बनवणं असो किंवा एखाद्या अभिनेत्रीला भेटवस्तू पाठवणे असो. पण, शाळेतील शिक्षिकेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याच्या या अनोख्या स्टाईलनं आज नागालँडच्या मंत्र्यांचंही लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर हा व्हिडीओ नागालँडचे उच्च तेमजेन इम्ना यांच्या अधिकृत एक्स (ट्विटर) @AlongImna या अकाउंटवरून शेअर केला गेला आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagaland minister temjen imna along video of practical learning in school a unique trick by teacher asp
Show comments