सोशल मीडिया म्हटलं की व्हायरल व्हिडिओची मेजवाणी. रोज कोणता तरी व्हिडिओ व्हायरल होत असतो. काही व्हिडिओ युजर्सना खळखळून हसायला भाग पाडतात. त्यात विचित्र डान्स म्हटलं की नेटिझन्स असे व्हिडिओ डोक्यावर घेतात. मित्रांसोबत एकत्र असल्यास आवडीने एकमेकांना व्हिडिओ दाखवत शेअर करतात. अनेकदा तर त्या व्हिडिओचं विश्लेषण करून जवळचा मित्र किंवा नातेवाईक असाच करतो, असं विशेषण देण्यासही विसरत नाही. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. लग्नाच्या मोसमात नागिन म्युझिक वाजवणं आणि त्यावर नाचणं सामान्य गोष्ट आहे. नागिन डान्सवर लोकांना नाचायला आवडतं, हे सर्वांना माहिती आहे. नागिन डान्समुळे भांडणं होऊ शकतात, यावर कदाचित तुमचा विश्वास बसणार नाही, मात्र हे खरं आहे.
एका व्हायरल व्हिडिओत तरूण नागिन डान्स करत बेधुंद होते. नाग बनलेल्या दोघांनी हाताचा फना करत एकमेकांना दंशही केला. मात्र एकमेकांना फना मारण्याच्या नादात राग अनावर झाला आणि सिंहरुप धारण केलं. एकमेकांच्या कॉलर पकडत तुटून पडले. दोघांची भांडणं पाहून वाजंत्री घाबरले आणि वाजवणं बंद केलं. तसेच आसपासच्या लोकांनी दोघांची भांडणं सोडवण्यास पुढाकार घेतला.
व्हायरल व्हिडिओ पाहून अनेक नेटिझन्सनी मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. त्याचबरोबर वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडिओ आवडीने शेअर करत आहेत. आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून अनेकांनी लाईक्स केला आहे.