लग्न, उत्सव, वरात या दरम्यान नागिन डान्स नसेल तर मजाच नाही. त्यामुळे या काळात बँड किंवा डीजे वाजला की, कुणाच्या तरी अंगात नागिन १०० टक्के येतेच येते. सोशल मीडियावर नागिन डान्सचे अनेक व्हिडीओ तुम्ही पाहिले असाल. कधी तरी तुम्हीही नागिन्स डान्स केला असेल. पण व्हायरल व्हिडीओत केलेले डान्स यापूर्वी तुम्ही कधीच पाहिला नसेल. या व्यक्तीने केलेला नागिन डान्स पाहून नेटकऱ्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. नागिन डान्स करताना जमिनीवर रांगतरांगत मंडपाच्या बांबूजवळ गेला. इथपर्यंत ठिक होतं. पण एखादा साप सरपटत जसा वर चढतो, अगदी तसाच तोही वर चढला. त्यामुळे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला वाटलं की आता खाली पडेल. जीवाची पर्वा न करता मंडपाच्या दुसऱ्या बाजूला आला. आता वाटलं तिथून व्यवस्थित खाली उतरेल. पण अंगात आलेली नागिन काही जाण्याचं नाव घेत नव्हती. दुसऱ्या बाजूला उटला टांगून नागिन डान्स करायला लागला.

नागिन डान्सचा व्हिडीओ तिथे उपस्थित असलेल्यांनी आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात चित्रित केला आणि सोशल मीडियावर शेअर केला. नागिन डान्स बघता बघता सोशल मीडियावर वाऱ्यासारखा व्हायरल होत आहे. नेटकरी हा व्हिडीओ पाहून पोट धरून हसत आहेत. तसेच हा व्हिडीओ इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर करत आहेत.

आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे. तसेच व्हिडीओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव सुरु आहे. एका युजर्सने लिहिलं आहे की, “भयानक नागिन आहे.” दुसऱ्या युजर्सने लिहिलं आहे की, “आमच्या इथे लग्नाला नाचायला येशील का?”