सध्या सोशल मीडियावर दोन रिक्षाचालकांचा एक अतिशय गोंडस व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये रस्त्याच्या बाजूला दोन रिक्षावाले मायकल जॅक्सन याच्या गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. या दोघांचा डान्स पाहून नेटकऱ्यांनी त्यांना देसी मायकल जॅक्सन म्हणायला सुरुवात केली. हा व्हिडिओ नागालँडचे मंत्री टेमजेन इमना अलॉन्ग (Temjen Imna Along) यांनी इंटरनेटवर शेअर केला आहे. जो लोकांना प्रचंड आवडला आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही दोन ऑटोरिक्षाचालकांना रस्त्याच्या कडेला ‘ब्रेक डान्स’ करताना पाहू शकता. दिवंगत पॉपस्टार मायकल जॅक्सनच्या ‘डेंजरस’ या गाण्यावर हे दोघे नाचत आहेत. नाचताना दोन्ही ऑटोचालकांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहण्यासारखा आहे. यादरम्यान दोघेही एकमेकांचे कौतुक करत आहेत. त्यामुळे त्यांचा उत्साहही वाढत आहे. दोघांचा डान्स पाहता दोघेही मायकल जॅक्सनचे चाहते असल्यासारखे वाटत आहे. दोघेही आपापल्या स्टाईलमध्ये डान्स करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा व्हिडिओ तामिळनाडूचा असल्याचे समजण्यात येत आहे.
( हे ही वाचा: Video: कोळ्याच्या जाळ्यात अचानक अडकला साप; त्यानंतर दोघांमधल्या लढाईत साप गुदमरला अन…)
येथे पहा व्हिडीओ
( हे ही वाचा: Video: कान दुखतोय म्हणून ‘ती’ डॉक्टरकडे गेली; तपासणीत कानात कोळी घर बनवताना पाहून डॉक्टरही चक्रावले)
हा व्हिडिओ नागालँडचे मंत्री तेमजेन इम्ना अलॉन्ग (Temjen Imna Along) यांनी शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलंय की,” ‘जर तुम्हाला आयुष्यात आनंद हवा असेल तर लोकांचे बोलणे मनावर घेणं बंद करा.” या व्हिडिओला आतापर्यंत ११५.७k व्ह्यूज मिळाले असून, ७ हजारांहून अधिक लोकांनी या व्हिडिओला लाईक केले आहे. व्हिडिओवर यूजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, त्यालाही आयुष्यात असा आनंद अनुभवायचा आहे.