Viral Video : असं म्हणतात वडील म्हणजे डोक्यावर असलेली छत्री असते. जो पर्यंत डोक्यावर ही छत्री आहे तोवर आपले कोणीही काहीही बिघडू शकत नाही. ते आपल्याला सर्व गोष्टी न सांगता देतात. त्यांच्याकडे एखादी गोष्ट मागण्याची सुद्धा आवश्यकता नसते पण अनेकदा मुलांना समजून घेणार्या या वडीलांविषयी फार कमी बोलले जाते किंवा लिहिले जाते. वडीलांवर आधारीत सध्या एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका कारच्या मागच्या काचेवर वडीलांविषयी खूप सुंदर संदेश लिहिला आहे. नेमका काय संदेश लिहिला आहे, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला व्हिडीओ पाहावा लागेल. (Nagpur driver wrote a message on four wheeler vehicle to express fathers gratitude video goes viral)
नागपूरच्या चालकाने गाडीच्या काचेवर लिहिला अतिशय सुंदर मेसेज
या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक कार दिसेल. या कारच्या मागच्या काचेवर सुंदर संदेश लिहिला आहे. कारच्या मागच्या काचेवर लिहिलेय, “आई वडिलांचा आशीर्वाद” आणि त्या खाली वडीलांवर सुंदर ओळ लिहिली आहे, “कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील.” या व्हिडीओवर लिहिलेय, “आज वाचलेलं सर्वात सुंदर वाक्य.
गाडीच्या नंबरप्लेटवरुन लक्षात येते की ही गाडी नागपूर येथील आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ (Video Viral)
nagpur_beats या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “कुठलाही नवस न करता पावणारा देव म्हणजे वडील लव्ह यू बाबा” तर एका युजरने लिहिलेय, “अगदी खरंय” आणखी एका युजरने लिहिलेय, “वडील हे कधीही न सोडवता येणारं कोडं आहे.” अनेक युजर्सनी या व्हिडीओवर हार्टचे इमोजी शेअर केले आहेत.
यापूर्वी सुद्धा गाडीच्या मागच्या काचेवर सुंदर संदेश लिहिलेले असे अनेक व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. काही महिन्यांपूर्वी असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्या व्हिडीओमध्ये चक्क अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात राहणाऱ्या एका पुणेकराने गाडीवर पुणेकर असं लिहिलेले होते. पुणेकर न्यूयार्कमध्ये सुद्धा त्यांच्या हटकेपणा दाखवायला विसरत नाही, यावरून तो व्हायरल व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला होता.