Loksabha Elections Video: विदर्भातील पाच मतदारसंघातील लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा १९ एप्रिल रोजी कोणत्याही मोठ्या वादाशिवाय शांततेत संपन्न झाला पण सध्या एका नव्या व्हिडीओमुळे सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चांना उधाण आले आहे. यामध्ये एक व्यक्ती मतदान करताना इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनवर शाई फेकताना दिसत असल्याचा व्हिडीओ व्हायरल होत असल्याचे लाईटहाउस जर्नालिझमला लक्षात आले. तपासादरम्यान हा व्हिडिओ विदर्भातील नसून ठाण्यातील असल्याचे आम्हाला कळले, शिवाय शेअर करताना यामध्ये एक मोठी चूक लपवण्यात आल्याचेही आमच्या लक्षात आले, नेमकं हे प्रकरण काय चला पाहूया..

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काय आहे दावा?

X यूजर, Sumaiya Khan ने व्हायरल विडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील समान दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

‘व्यक्तीने ईव्हीएमवर शाई फेकली’ अश्या काही मिळत्या जुळत्या शब्दांचा वापर करून आम्ही YouTube कीवर्ड सर्च करून आमचा तपास सुरू केला. आम्हाला न्यूज18 इंडियाच्या यूट्यूब चॅनेलवर एक व्हिडिओ सापडला.

ईव्हीएमवर शाई फेकणारा माणूस बसपाचा नेता असल्याचे व्हिडीओच्या माध्यमातून आम्हाला समजले. व्हिडीओमधील व्यक्तीचे नाव ‘सुनील खांबे’ असे आहे.
हा व्हिडिओ चार वर्षांपूर्वी चॅनलवर अपलोड करण्यात आला होता. आम्ही पुढे गूगल कीवर्ड सर्च केला आणि अनेक प्लॅटफॉर्मवर यासंबंधित क्लिप आणि बातम्या आढळल्या.

https://timesofindia.indiatimes.com/videos/city/mumbai/maha-polls-bsp-leader-sunil-khambe-arrested-for-throwing-ink-at-evm/videoshow/71691332.cms

ही घटना ठाण्यात घडल्याचे बातमीत नमूद करण्यात आले असून, सुनील खांबे याला तात्काळ पोलिसांनी अटक केल्याचेही आम्हाला या वृत्त अहवालांमध्ये समजले.

हे ही वाचा<< Video: यंदा तुम्ही देऊ शकता ‘चॅलेंज व्होट’? महिलेने सांगितलेला नियम काय? निवडणूक आयोगाची भूमिका वाचा

तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही एएनआयचे नागपूरचे प्रतिनिधी सौरभ जोशी यांना संपर्क केला, त्यांनी आम्हाला सांगितले की, मतदानाच्या पहिल्या टप्प्यात नागपुरात अशी कोणतीही घटना घडली नाही.

निष्कर्ष: एका व्यक्तीने ईव्हीएमवर शाई फेकल्याच्या घटनेचा २०१९ चा ठाण्यातील जुना व्हिडिओ नागपुरातील अलीकडचा असल्याचा सांगून मोठ्या प्रमाणात होत आहे शेयर. व्हायरल दावा खोटा आहे.