Shocking video: आजही आपल्या देशात अनेक ठिकाणी विवाहित महिला आणि मुलींचा हुंड्यासाठी छळ होतो. त्यांना शारीरीक व मानसिक त्रास दिला जातो. या गोष्टींचा पीडितांना त्रास तर होतोच शिवाय त्यांच्या माहेरच्या लोकांना देखील याचा मनस्ताप सहन करावा लागतो.भारतीय घरांमध्ये महिलांचा शारीरिक आणि मानसिक छळ काही नवीन नाही. पण बहुतांश महिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र नसल्यामुळेच हा हिंसाचार सहन करतात.असाच एक धक्कादायक व्हिडीओ नागपूरमधून सध्या समोर येत आहे ज्यामध्ये एका मुलीचा सासरी छळ होत असल्यानं तिची काय अवस्था झालीय ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल. वडिलांप्रमाणे असणाऱ्या सासऱ्यांनी आपल्या सुनेची केलेली अवस्था पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
नागपुरात विजेचा शॉक देऊन सासू-सासऱ्याने सुनेला ठार मारण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जयताळा मार्गावरील अष्टविनायकनगर येथे घडली.वायरने त्यांना शॉक दिला. शॉक लागताच प्रीती घाबरल्या. स्वतःला सावरत त्यांनी दोघांच्या तावडीतून सुटका केली. त्या खोलीत जायला लागल्या.दोघांनी केस पकडून त्यांना पायऱ्यांवरून ओढत खाली आणले. लाथा-बुक्क्यांनी प्रीती यांना मारहाण करायला सुरुवात केली. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, सासऱ्यांनी तिची भयंकर अवस्था केली आहे. तिला इतकं मारलं आहे की तिचा चेहरा रक्तानं माखला आहे. संपूर्ण चेहरा विद्रूप झाला आहे. यावेळी प्रीती यांनी आरडाओरड केली तेव्हा शेजारी व नातेवाईक त्यांच्या मदतीसाठी धावले.
जखमी प्रीती यांना खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले, असे प्रीती यांनी तक्रारीत म्हटले आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी महिलेच्या सासू-सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. धक्कादायक व्हिडीओमध्ये एका मुलीचा सासरी छळ होत असल्यानं तिची काय अवस्था झालीय ते पाहून तुमच्याही पायाखालची जमीन सरकेल.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियावर हा व्हिडीओ nagpur_news_station नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. यावर आता नेटकरीही व्हिडीओवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. एकानं लिहलंय, “सासरा आहे की राक्षस आहे..हैवान” तर आणखी एकानं, ”अरेंज मॅरेज किती भीतीदायक आहे” अशी प्रतिक्रिया दिली आहे.यांसराख्या अनेक संतापजनक प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी व्हिडीओवर दिल्या आहेत.