Viral Video : सध्या सगळीकडे गणेशोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. काही दिवसांवर गणपती उत्सव आहे. अनेक ठिकाणी ढोल ताशा पथकांची तालीम सुरू आहे, अनेक शहरात ढोल ताशा पथक त्यांच्या त्यांच्या मंडळाबरोबर प्रॅक्टिस करत आहे. सोशल मीडियावर सुद्धा असे अनेक ढोल ताशा पथकांचे व्हिडिओ व्हायरल होत आहे. सध्या असाच एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओमध्ये एका ढोल ताशा पथकाची तालीम सुरू असताना चिमुकला हातात कागदी खोका घेऊन ढोल ताशाचा ठेका धरताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल. या चिमुकल्याचे ढोल ताशा वरील प्रेम पाहून कुणीही अवाक् होईल.
व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल एका मोठ्या मैदानावर काही तरुण मंडळी ढोल ताशाची प्रॅक्टिस करत आहे. या तरुणांमध्ये एक चिमुकला सुद्धा छोटासा खोका घेऊन उभा आहे आणि या तरुणांबरोबर ढोल ताशाची प्रॅक्टिस करत आहे. ढोल ताशाच्या तालावर ठेका धरताना हा चिमुकला दिसतो. या चिमुकल्या मुलाचा नाद पाहून तुम्हीही कोणीही अवाक् होईल. व्हिडिओवर लिहिलेय, ” पॅशन आणि टॅलेंट” हा व्हिडीओ नागपूरच्या कामठी कन्हान येथील आहे.
पाहा व्हायरल व्हिडीओ
vighnaraje__pratishthan या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, ” जोश” या व्हिडिओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिली आहे. एका युजरने लिहिलेय, “त्या बारक्यासाठी पथकाने एक छोटा ढोल ताशा आणला पाहिजे. मस्त वाजवणार तो..” तर दुसऱ्या एका युजरने लिहिलेय, ” भाऊ त्याला ढोल हवा असेल तर मी देतो मला संपर्क करा.” या युजरने मोबाईल क्रमांक सुद्धा दिलेला आहे. आणखी काही युजरने लिहिलेय, “नाद हा असलाच पाहिजे आणि जर तो नाद करायचा असेल तर तो तुम्हाला नक्कीच आयुष्यात पुढे घेऊन जाणार.” यावर विघ्नराजे प्रतिष्ठान तर्फे प्रतिक्रिया आली आहे ते सांगतात, “मुलगा रोज आपल्या घरातल्या आवाजावर प्रॅक्टिस करत होता पण त्याला थोडा संकोच वाटत होता कारण त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नाही. तरीही त्याने पुढे जाऊन स्वतः बॉक्सवर ढोल वाजवायला सुरुवात केली. त्याचा जोश, टॅलेंट आणि उत्कटतेला पाहून आम्ही त्याला आपल्या पथकात प्रवेश दिला आहे. कृपया कोणत्याही चुकीच्या गोष्टी पसरवू नका आणि चुकीच्या टिप्पण्या करू नका.