Nagpur Violence Fact Check : १७ मार्च रोजी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारात ११० हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. या घटनेतील मुख्य आरोपी फहीम खानच्या घरावर बुलडोझर कारवाईला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. अशात सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अनेक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केले जात आहेत.

अशाच एका व्हिडीओमध्ये पोलिस अधिकारी नागरिकांना मारहाण करताना दिसत आहेत. व्हिडीओसोबत असा दावा करण्यात आला होता की, नमाज अदा करण्यासाठी गेलेल्यांना नागपूर पोलिसांनी मारहाण केली.

काय होत आहे व्हायरल?

एक्स युजर Thanos_Pandit ने X वर दिशाभूल करणारी माहिती असलेला व्हिडीओ शेअर केला आहे.

इतर युजर्सदेखील अशाच दाव्यांसह व्हिडीओ शेअर करीत आहेत.

नागपूर हिंसाचार २०२५

तपास :

व्हिडीओमधून मिळालेल्या कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही आमचा तपास सुरू केला. यावेळी आम्हाला दोन वर्षांपूर्वी फेसबुकवर अपलोड केलेला एक व्हिडीओ सापडला.

यावरून हे स्पष्ट झाले की, हा व्हिडीओ अलीकडील नाही.

आम्हाला मकतूब या यूट्यूब चॅनेलवरही हा व्हिडीओ आढळून आहे.

हा व्हिडीओ १३ एप्रिल २०२२ रोजी अपलोड करण्यात आला होता.

कॅप्शनमध्ये म्हटले आहे : मध्य प्रदेशातील खरगोन येथील मकतूब यांनी मुस्लिमांवर हल्ला करणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांचे व्हिज्युअल शेअर केले आहेत. टीकाकारांची तक्रार आहे की, रामनवमीच्या उत्सवात हिंसक वळण लागल्यानंतर पोलिस मुस्लिमांवर अत्याचार करीत आहेत.

आम्हाला एमपी तकच्या यूट्यूब चॅनेलवरही हे व्हिज्युअल सापडले. हा व्हिडीओ दोन वर्षांपूर्वी अपलोड करण्यात आला होता.

आम्हाला २०२२ मध्ये खरगोन हिंसाचाराच्या बातम्यादेखील सापडल्या.

https://www.indiatoday.in/india/story/khargone-violence-top-developments-stone-pelting-curfew-1937800-2022-04-15

निष्कर्ष :

२०२२ मध्ये खरगोन हिंसाचाराच्या घटनेचा व्हिडीओ नागपूरमधील हिंसाचाराच्या घटनेशी जोडून दिशाभूल करणाऱ्या दाव्यासह शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.