Nagpur Violence Fact Check Video : नागपूर हिंसाचार प्रकरणात आतापर्यंत ११४ हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे; तर मुख्य आरोपी फहीम खानचे घर तोडण्यात आले. त्यामुळे नागपूरमधील हिंसाचाराच्या रात्रीशी संबंधित अनेक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले जात आहेत. अशाच एका व्हिडीओमध्ये आरएसएस नेते इंद्रेश कुमार इफ्तार पार्टीला उपस्थित असल्याचे दाखवले गेले आहे. त्यात असा दावा करण्यात आला आहे की, नागपूरमधील हिंसक घटनेच्या रात्री नवी दिल्लीत झालेल्या इफ्तार पार्टीला आरएसएस नेते इंद्रेश कुमार इफ्तार उपस्थित होते. पण, खरंच असं काही घडलं होत का याविषयीचे सत्य जाणून घेऊ.
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर एआर एन बी जय प्रकाश यांनी खोट्या दाव्यासह व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजर्सदेखील समान दाव्यांसह हा व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
व्हिडीओमधून मिळालेल्या काही कीफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च करून, आम्ही तपास सुरू केला.
यावेळी आम्हाला न्यूज18 इंडियाने नऊ दिवसांपूर्वी पोस्ट केलेला एक व्हिडीओ सापडला. हा व्हिडीओ १६ मार्च २०२५ रोजी पोस्ट करण्यात आला होता.
व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, दिल्लीतील कम्युनिटी सेंटरमध्ये इफ्तार पार्टी आयोजित करण्यात आली होती. आरएसएस नेते इंद्रेश कुमार यांनी या इफ्तार पार्टीला हजेरी लावली… इंद्रेश कुमार यांनी इमाम उमर अहमद इलियासी यांचा रोजा सोडला… या इफ्तार पार्टीतील इंद्रेश कुमार यांच्या उपस्थितीमुळे देशात एकजुटीचे वातावरण असल्याचे दिसून येते. दरम्यान, बोलताना त्यांनी व्होट बँकांच्या राजकारणावर काय म्हटले ते ऐका…
आम्हाला १० दिवसांपूर्वी एएनआय भारतवर पोस्ट केलेला एक व्हिडीओदेखील सापडला.
इंद्रेश कुमार यांनी फेसबुकवर निमंत्रण पत्रासह कार्यक्रमाचे फोटोदेखील पोस्ट केले होते.

निमंत्रण पत्रात उल्लेख आहे की, हा कार्यक्रम शनिवार, १५ मार्च २०२५ रोजी नवी दिल्लीतील निजामुद्दीन पश्चिम येथील कम्युनिटी सेंटरमध्ये झाला. सोमवार, १७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्रातील नागपूर येथे हिंसाचार उफाळून आला.

निष्कर्ष :
नागपूरमधील हिंसाचाराच्या दिवशी आरएसएस नेते इंद्रेश कुमार इफ्तार पार्टीला उपस्थित राहिलेले नाहीत. ते नवी दिल्लीतील हिंसाचाराच्या घटनेच्या दोन दिवस आधी इफ्तार पार्टीला उपस्थित होते. त्यामुळे व्हायरल केला जाणारा दावा खोटा आहे.