Nagpur Violence Fact Check Video : मुघल सम्राट औरंगजेबाची कबर काढून टाकण्याची मागणी झाल्यानंतर १७ मार्च २०२५ रोजी महाराष्ट्र राज्यातील नागपूरमध्ये जातीय हिंसाचार उफाळून आला.
नागपूर हिंसाचारातील प्रमुख आरोपी फहीम खान याच्यासह पाच जणांवर पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. या दरम्यान, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक व्हिडीओ शेअर केला जात आहे, जो नागपूरमधील अलीकडचा असल्याचा दावा करण्यात येत आहे. पण तपासादरम्यान एक वेगळेच सत्य समोर आले. ते सत्य नेमके काय आहे जाणून घेऊ…
काय होत आहे व्हायरल?
एक्स युजर विकासने ‘नागपूरची शक्ती’ असे म्हणत व्हिडीओ शेअर केला आहे.
इतर युजरदेखील त्याच दाव्यासह व्हिडीओ शेअर करीत आहेत.
तपास :
आम्हाला व्हिडीओवर ‘@vedantcreation’ हा वॉटरमार्क सापडला. त्यानंतर आम्ही इन्स्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडीओ शोधला.
आम्हाला १० डिसेंबर २०२४ रोजी @vedantcreation च्या प्रोफाइलवर पोस्ट केलेला व्हिडीओ आढळून आला.
https://www.instagram.com/p/DDZbyv2yol_/
कॅप्शनमध्ये म्हटले आहे की, नागपूरमध्ये सकल हिंदू समाजद्वारे आयोजित जन आक्रोश मोर्चा व्हरायटी स्क्वेअर
अशाच १० डिसेंबर २०२४ रोजी पोस्ट केल्या गेलेल्या एका व्हिडीओला, ‘यही तो नागपूर है,’ अशी कॅप्शन देण्यात आली होती.
त्यानंतर आम्ही सकल हिंदू समाज, नागपूर हा कीवर्ड चालवला आणि एबीपी माझा न्यूज चॅनेलवर एक व्हिडीओ न्यूज रिपोर्ट सापडला.
आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर कार्यक्रमापूर्वीचा एक न्यूज रिपोर्टदेखील सापडला.
आम्हाला टाइम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर कार्यक्रमातील फोटोंची गॅलरीदेखील सापडली.
सध्या नागपूरमध्ये अनेक ठिकाणी संचारबंदी लागू करण्यात आली आहे आणि हिंसाचारानंतर असे कोणतेही कार्यक्रम झालेले नाहीत.
निष्कर्ष :
नागपूरमध्ये झालेल्या सकल हिंदू समाजाच्या मेळाव्याचा जुना व्हिडीओ नागपूर हिंसाचाराच्या घटनेनंतरचा असल्याचे सांगून शेअर केला जात आहे. त्यामुळे व्हायरल दावा दिशाभूल करणारा आहे.