Nagpur viral video: पावसाळ्यात अनेकांना सहलीचे वेध लागतात. या कालावधीत पर्यटक धबधब्याखाली भिजण्याचा आनंद घेण्यासाठी तेथे जातात. काही पर्यटक तिकडे भलतंच साहस करतानाही दिसतात. पण, असे साहस काही वेळा पर्यटकांच्या अगदी जीवावर बेतण्यासारखा प्रसंग घडतो. अशा घटना पाहता, वारंवार सांगितलं जातं की, पाण्याशी कधी खेळू नका. तरीही काही पर्यटक जीवाची पर्वा न करता, धबधब्याखाली भिजण्याचा मनमुराद आनंद लुटताना दिसतात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपुरातून एक धक्कादायक बातमी समोर

नागपूरमधून एक थरारक व्हिडीओ समोर आला आहे; ज्यामध्ये तलावाच्या सांडव्यावर उभं राहून स्टंटबाजी करणं तरुणाला भोवलंय. त्यात स्टंटबाजी करण्याचा प्रयत्न करणारा तरुण तलावात कोसळलाय. त्याला पोहता येत नसल्याने त्याचा बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. याचा धडकी भरवणारा व्हिडीओ सध्या मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही धबधब्यावर जाताना १०० वेळा विचार कराल एवढं नक्की.

स्टंटबाजी तरुणाच्या अंगलट

स्वातंत्र्य दिनानिमित्ताने नागपूर जिल्ह्याच्या मकरधोकडा तलावावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. त्यामध्ये मोठ्या संख्येने तरुणाई या ठिकाणी आली होती. त्याच वेळी या गर्दीतील एकाने नसते धाडस केले आणि त्यामुळे ही दुर्घटना घडली आहे. धक्कादायक बाब म्हणजे शेकडो लोक घटनास्थळी उपस्थित असतानाही या तरुणाच्या बचावकार्यात यश आले नाही.

क्षणात झालं होत्याचं नव्हतं

या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, तीन तरुण अचानकच ज्या सांडव्यावरून तलावाचे पाणी समोरच्या दिशेने वाहते, त्या सांडव्याच्या भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करू लागले. एक तरुण त्यात यशस्वी झाला; मात्र दोघे खाली घसरले. त्यातील जो तरुण सांडव्याच्या भिंतीवर उभा राहिला होता, तो नंतर मागच्या दिशेला तलावात कोसळला. त्याला पोहता येत नसल्यामुळे त्याचा काही सेकंदांत पाण्यात बुडून मृत्यू झाला. काहींनी हे दृश्य मोबाईलमध्ये कैद केले. मात्र, त्यातील काही मोजक्या लोकांनी त्याच्या बचावासाठी प्रयत्न करूनही त्यांना त्यात यश आले नाही.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> VIDEO: “दैवानं तर छळलं पण व्यवस्थेनंही सोडलं नाही” महाराष्ट्रातल्या ST स्टँडवर दिव्यांगाची अवस्था पाहून मन सुन्न होईल

हा व्हिडीओ सोशल मीडियावर journalist.ajay_25 नावाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या दुर्घटनेनंतर पर्यटकांनी स्वत:ची काळजी घेणे आणि जीव धोक्यात जाईल असे कोणतेही कृत्य करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nagpur youth stunt video makardhokada dam accident young man fell into the lake and died of drowning on the spot the incident happened srk