Nagpur Tarri Pohe : नागपूर हे महाराष्ट्राची उपराजधानी आहे. नागपूर हे विदर्भ विभागातील सर्वात मोठे शहर मानले जाते. देशाचा सेंटर पॉइंट, संत्राची सर्वात मोठी बाजारपेठ, विधानसभेचे हिवाळी अधिवेशन, टायगर कॅपिटल ऑफ इंडिया, अशा अनेक गोष्टींमुळे नागपूर नावाजलेलं आहे. संत्रानगरी म्हणून ओळखले जाणारे नागपूर आणखी एका खास गोष्टीसाठी ओळखले जातात, ते म्हणजे तर्री-पोहे. लहान असो की मोठे, कॉलेजमधील तरुण मंडळी ते ऑफीसला जाणारा कर्मचारी वर्ग, सर्वांची सकाळ गरमा-गरम तर्री-पोह्यांमुळे होते.
तर्री-पोहे ही नागपूरची ओळख आहे पण तुम्हाला माहिती आहे का, नागपूरचे तर्री-पोहे कसे बनवले जातात? नागपूरचे विक्की तर्री-पोहे हे खूप लोकप्रिय आहे. लोकसत्ताशी संवाद साधताना त्यांनी पोहे कसे बनवायचे, हे सांगितले. त्यासाठी तुम्हाला हा व्हिडीओ पाहावा लागेल.
व्हिडीओत दाखवल्याप्रमाणे, सुरुवातीला ते एका मोठ्या भांड्यात पाणी उकळतात आणि त्यात सावजी मसाला घातलेली झणझणीत तर्री घालतात. या तर्रीला चांगली उकळी आली की ते यात टोमॅटो घालतात आणि टोमॅटो चांगले शिजू देतात. शेवटी ते उकळलेले चणे घालतात आणि पुन्हा थोडा वेळ शिजू देतात. अशाप्रकारे तर्री तयार करतात
पोहे ते अत्यंत साध्याप्रकारे बनवतात. सुरुवातीला पोहे भिजवून घेतात. त्यानंतर एका पातेल्यात गरम तेल करतात त्यात हळद आणि मीठ घालतात. हळद मीठ घातलेलं तेल ते भिजवलेल्या पोह्यात मिक्स करतात आणि पोहे थोडे गरम करतात.अशाप्रकारे नागपूरचे तर्री पोहे काही क्षणात बनवले जातात.
हेही वाचा : यालाच खरं प्रेम म्हणतात… चक्क बस स्थानकावर येऊन कुत्रा मालकाची वाट बघतोय, पाहा व्हिडीओ
नागपूर आणि तर्री पोह्यांच एक अनोखं नातं आहे. जर तुम्ही नागपूरला जाण्याचा विचार करत असाल तर नागपूरची हे तर्री पोहे नक्की खा. नागपूरात तर्री पोहे खायचे असतील तर कस्तूरचंद पार्कसमोर पोह्यांची असंख्य दुकाने आहेत. विशेष म्हणजे विक्की चणा पोहा नागपूरात विशेष फेमस आहे.
loksattalive च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन शेअर केलेल्या या व्हिडीओवर हजारो लाईक्स आलेल्या आहेत.जवळपास ४२ हजार लोकांनी हा व्हिडीओ पाहिलेला आहे.या व्हिडीओवर काही युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिलेय, “विक्की भाऊचे पोहे खास असतात” तर एका युजरने लिहिलेय, “अप्रतिम चव”