Viral Photo : सोशल मीडियावर दर दिवशी नवनवीन गोष्टी व्हायरल होत असतात. सध्या एका नागपूरच्या तरुणीचा एक फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये ही तरुणी हातात पाटी घेऊन उभी आहे. त्या पाटीवर असे काही लिहिलेय, की पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

तुम्ही आजवर अनेक पुणेरी पाट्या पाहिल्या असतील किंवा हातात पाटी घेऊ उभे असणारे अनेक तरुण पाहिले असतील जे पाटीवर कधी मजेशीर तर कधी विचार करायला लावणारे संदेश लिहितात. नागपूरची ही तरुणी सुद्धा हातात पाटी घेऊन उभी आहे. तिने काय लिहिलेय, जाणून घ्या. (Nagpur’s young girl paati viral)

Siddharth Chandekar
“असं कसं तुटेल?”, सिद्धार्थ चांदेकरने सादर केली नात्यांवर आधारित कविता; म्हणाला, “आठवणींची जागा अहंकारानं…”
Pushpak train accident of karnataka express play horn may save life of many passengers
Jalgaon Train Accident : कर्नाटक एक्स्प्रेसच्या चालकाने भोंगा वाजवला…
young man swallowed nail during carpentry
सुतारकाम करताना तरुण अचानक लोखंडी खिळा गिळतो तेव्हा…
prasad oak baburav paintar biopic
प्रसाद ओक करणार प्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक बाबुराव पेंटर यांची भूमिका; पोस्ट शेअर करत म्हणाला, “ही भूमिका साकारायला मिळणं हा श्री…”
Marketing idea smart vegetable seller shows funny poster for ladies goes viral on social Media
PHOTO: “महिलांना फेसबूक, व्हॉट्सअॅपसाठी…” भाजी विक्रेत्यानं खास महिलांसाठी लावली अशी पाटी की वाचून पोट धरुन हसाल
ramdas kadam aditya thackeray
“…म्हणून आदित्य ठाकरे देवेंद्र फडणवीसांना भेटले”, रामदास कदमांचा टोला; म्हणाले, “आता देवा भाऊचा जप…”
shikaayla gelo ek marathi drama review
नाट्यरंग : शिकायला गेलो एक! व्यंकूची ‘आज’ची शिकवणी
Viral Video Drunk Man Pinned Down By Ticket Checker Train Attendant Flogs Him
“लाथा-बुक्या मारल्या, अन् पट्ट्याने धू धू धूतले! तरुणीला छेडणाऱ्या मद्यधुंद व्यक्तीला टीसी आणि ट्रेन अटेंडंटने दिला चोप, Video Viral

“लोकं बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्यापेक्षा…”

हा व्हायरल फोटो नागपूरच्या गणेशोत्सवातील आहे. नऊवारी नेसलेली आणि साज श्रृंगार केलेली एक तरुणी हातात पाटी घेऊन उभी आहे. ही तरुणी नागपूरच्या कलावंत ढोल ताशा पथकातील आहे. या पाटीवर लिहिलेय, “लोकं बोलतात बाईच्या डोक्यावर पदर असावा पण त्यापेक्षा मला वाटतं आपल्या डोळ्यात आदर असावा…! – कलावंत ढोल ताशा पथक, नागपूर”

हेही वाचा : “पालकांबरोबर राहताना WFH करणे म्हणजे Squid Game..” तरुणाच्या पोस्टमुळे भडकले नेटकरी, एक्सवर पेटला नवा वाद, पाहा Viral Post

व्हायरल फोटो पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा (Photo Viral)

https://www.instagram.com/reel/DAPtLJBtSDv/?igsh=MXR0cXVwaHRuN3U0Nw%3D%3D

cute_story_30 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा फोटो शेअर करण्यात आला असून या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.
एका युजरने लिहिलेय, “खरं आहे ताईसाहेब, जय शिवराय” तर एका युजरने लिहिलेय, “हे मात्र खरं आहे ताई” आणखी एका युजरने लिहिलेय, “डोक्यावर पदर नसलेल्या बाईचा आदर करायचा नाही, ही तर महाराष्ट्राची संस्कृती नाही” काही युजर्सनी या महिलेवर टीका करत तिला डोक्यावर पदर घेण्याचा सल्ला दिला आहे.

हेही वाचा : Gaurav Taneja Divorce: युट्यूबर गौरव तनेजा घेणार पत्नी रितू राठीबरोबर घटस्फोट? फ्लाईंग बीस्टने अखेर सोडलं मौन, म्हणाला, “जे माझ्यावर प्रेम…”

काही दिवसांपूर्वी मुंबईच्या लालबागमध्ये तरुणाची पाटी व्हायरल चर्चेचा विषय ठरली होती. गणेशोत्सवादरम्यान य तरुणाने पाटीवर असे काही लिहिले होते की पाहून सगळ्याच मुली लाजताना दिसल्या. या तरुणाने पाटीवर लिहिले होते, “फक्त गर्दीत हात धरणारी नको सोबत हरतालिकेचा उपवास धरणारी हवी” या तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला होता.

Story img Loader