सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओ मध्ये एक व्यक्ती सरकारी अधिकाऱ्यावर कुत्र्यासारखा भुंकत आहे. नेमकं यामागचं कारण काय हे आपल्याला व्हिडीओ पाहताना समजत नाही. त्यातच मध्ये हा विचित्र प्रकारे सरकारी अधिकाऱ्यांना त्रास देणारा माणूस त्या अधिकाऱ्यांना काही कागदपत्रही दाखवत असल्याचे दिसत आहे, नेमकं काय घडलं जाणून घ्या.
व्हायरल होणाऱ्या हा व्हिडीओ पश्चिम बंगालमधील आहे. एएनआय वृत्तसंस्थेने दिलेल्या रिपोर्टनुसार, या व्हिडीओत दिसणाऱ्या व्यक्तीचे आडनाव रेशन कार्डवर चुकीचे लिहण्यात आले आहे, त्याचा निषेध करण्याचा हा पर्याय या व्यक्तीने निवडला. या व्यक्तीचे आडनाव ‘दत्ता’ आहे पण रेशन कार्डवर त्यांचे नाव ‘कुत्ता’ असे लिहण्यात आले आहे. असंख्य वेळा याबाबत तक्रार करूनही सरकारी कार्यालयातून या नाव दुरुस्तीबाबत कोणतीही दखल घेण्यात आली नाही त्यामुळे त्रस्त झालेल्या या व्यक्तीने थेट सरकारी अधिकाऱ्यांसमोरच याचा निषेध करण्याचे ठरवले. या व्यक्तीने ब्लॉक डेव्हलपमेंट ऑफिसर (बीडीओ) यांच्यासमोर कुत्र्याप्रमाणे भुंकत या मानसिक त्रासाचा निषेध व्यक्त केला. पाहा व्हायरल होणारा हा व्हिडीओ.
आणखी वाचा : भूक अनावर झाल्याने हत्तीने चक्क…; Video शेअर करत IAS Officer सुप्रिया साहू यांनी व्यक्त केली खंत
व्हायरल व्हिडीओ :
हा व्हायरल व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या व्यक्तीला नावावरून होत असणाऱ्या त्रासाबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे, तर काहींनी सरकारी अधिकाऱ्यांना अशाप्रकारे त्रास देण्याची ही पद्धत चुकीची असल्याची म्हटले आहे.