युद्धग्रस्त युक्रेनमध्ये हजारो भारतीय विद्यार्थी अडकून पडले आहेत. ऑपरेशन गंगा नावाने केंद्र सरकारने या विद्यार्थ्यांना भारतामध्ये परत आणण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. मात्र आता याच मुद्द्यावरुन विरोधक आणि सत्ताधारी असा आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. केंद्रातील मंत्री सरकारकडून केल्या जाणाऱ्या कामांबद्दल बोलताना दिसत आहेत. मात्र असच एक स्पष्टीकरण देताना केंद्रीय लघू व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी युक्रेनमधील परिस्थिती सांगताना देशाचं नाव चुकीचं घेतल्याने त्यांना ट्रोल केलं जात आहे. नारायण राणेंचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

नक्की वाचा >> Ukraine War: पुतिन यांचा मोदींना कॉल, रशियाने केला धक्कादायक दावा; म्हणाले, “युक्रेननेच भारतीय…”

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नारायण राणे काल (१ मार्च २०२२ रोजी) मुंबईमध्ये ऑपरेशन गंगा अंतर्गत भारतात आलेल्या सातव्या विमानामधील विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी मुंबई विमानतळावर हजर होते. रुमानियाची राजधानी बुकुरॅस्त येथून हे विमान १८२ भारतीयांना घेऊन मुंबईत दाखल झालं होतं. मात्र या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी गेलेल्या नारायण राणेंना वृत्तसंस्थेशी बोलताना या देशाचं आणि त्याच्या राजधानीचं नावं नीट घेता आलं नाही.

नक्की वाचा >> Ukraine War: मोठी बातमी! पुतिन यांनी Nuclear Attack च्या भीतीने आपल्या कुटुंबियांना…

व्हिडीओ व्हायरल…
‘नारायण राणेंनी लावला नव्या देशाचा व त्याच्या राजधानीचा शोध’ अशा मथळ्याखाली हा व्हिडीओ व्हायरल झालाय. या व्हिडीओमध्ये नारायण राणे हे युक्रेनमधील भारतीय विद्यार्थ्यांसंदर्भात एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना दिसत आहेत.

नक्की वाचा >> Ukraine War: “भारत, पाकिस्तान, चीन सरकारने मॉस्कोवर…”; युक्रेन सरकारनं केलं आवाहन

राणे नक्की काय म्हणाले
एएनआयशी हिंदीमध्ये बोलताना नारायण राणेंनी, “विद्यार्थी युक्रेनमध्ये होते. तेथील परिस्थिती पाहून ते घाबरले होते. त्यामुळे ते तेथून जवळच्या देशामध्ये, ‘ओमानीया’मध्ये गेले. त्या देशाची राजधानी ‘बुखारीया’ आहे,” असं म्हणाले आहेत.

मोदींचा रुमानियाच्या पंतप्रधानांना फोन
पंतप्रधान मोदींनी सोमवारी रात्री रुमानियाचे पंतप्रधान निकोले-इओनेल सिउका यांनाही फोन करुन त्यांचे आभार मानले. युक्रेनमधून भारतीयांना परत आणण्यासाठी रुमानियाकडून केल्या जाणाऱ्या मदतीसाठी मोदींनी आभार व्यक्त केलं. व्हिजाशिवाय भारतीय नागरिकांना देशामध्ये प्रवेश देण्याचा निर्णय रुमानियन सरकारने घेतल्याबद्दल मोदींनी आभार व्यक्त केले. तसेच भारताला विशेष विमानांनी भारतीय नागरिकांना परत मायदेशी नेण्यासाठी विमानतळं आणि उड्डाणे करण्यासाठीची सोय उपलब्ध करुन दिल्याबद्दलही मोदींनी निकोले-इओनेल सिउका यांना धन्यवाद म्हटल्याचं एएनआयने दिलेल्या वृत्तात म्हटलंय.

नक्की पाहा हे फोटो >> Photos: कोणी म्हणतंय हिटलर तर कोणी म्हणतंय नरकात जळणार; जगभरातील Anti-Putin मोर्चांमधील पोस्टर्स पहिलेत का?

शिंदेकडे जबाबदारी सोपवल्याची दिली माहिती…
यावेळी पंतप्रधान मोदींनी निकोले-इओनेल सिउका यांना भारताचे नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांना रुमानियामधून भारतीयांना मायदेशी आणण्यासंदर्भातील मोहिमेसाठी नियुक्त करण्यात आल्याची माहितीही दिली. पुढील काही दिवस शिंदे हेच स्थानिक प्रशासनासोबत रुमानियामधून भारतीयांना परत आणण्यासंदर्भातील नियोजन पाहतील असं पंतप्रधान मोदींनी सिउका यांना कळवल्याचं पंतप्रधान कार्यालयाने स्पष्ट केलंय.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayan rane video goes viral as central minister mispronounce romania bucharest scsg