Narayana Murthy love story : देशातील सर्वात मोठ्या आयटी कंपन्यांपैकी एक असलेल्या इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी एकेकाळी रेल्वेमध्ये जवळपास ११ तास विना तिकीट प्रवास केला होता. पत्नी सुधा मूर्ती यांना यांच्या प्रेमासाठी त्यांनी हे धाडस केले होते. नारायण मूर्ती यांनी स्वत: तिकीट शिवाय प्रवास करण्याचा किस्सा सांगितला. सध्या हा किस्सा सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

CNBC-TV18 च्या अँकर शिरीन भानला दिलेल्या मुलाखतीदरम्यान नारायण मूर्ती यांनी हा किस्सा सांगितला. चित्रा बॅनर्जी दिवाकरुनी या अमेरिकन वंशाच्या भारतीय वंशाच्या लेखिका यांनी ‘अॅन अनकॉमन लव्ह: द अर्ली लाइफ ऑफ सुधा अँड नारायण मूर्ती’ हे पुस्तक लिहिले आहे. नावावरून स्पष्ट आहे की, हे पुस्तक इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती आणि त्यांची पत्नी सुधा मूर्ती यांची प्रेमकथेवर आधरित आहे.

हेही वाचा – Video : “गं तुझं टपोरं डोलं जसं कोळयाच जालं…”; मनीमाऊचा मराठमोळा साज शृंगार बघाच, पाहताक्षणी पडाल प्रेमात!

नारायण मूर्तीं किस्सा ऐकून सुधा मूर्तींना आले हसू
पुस्तक प्रकाशन सोहळ्या प्रसंगी बोलताना नारायण मूर्ती म्हणाले, “त्या काळात मी प्रेमात होतो. इतर कोणी काय सांगेल तेच मी सांगत आहे.… मी कशाबद्दल बोलत आहे ते तुम्हाला माहिती आहे. त्या वयात शरीरातील हार्मोन्स उड्या मारत होते… ” हे सांगत असताना पत्नी सुधा मूर्ती यांनी त्यांना अडवले आणि पुढे काहीही न बोलण्याची सूचना केली. त्यानंतर पुढे नारायण मूर्ती म्हणाले, “तुम्हाला माहित आहे की, “ती(प्रेम) भावना काय असते.” अब्जाधीश नारायण मूर्ती जेव्हा CNBC-TV18 ला हा किस्सा सांगत होते तेव्हा त्यांच्या पत्नी सुधा मूर्ती चेहऱ्यावर हात ठेवून हसत होत्या.

हेही वाचा – Video : ऐन हिवाळ्यात पुण्यात पडला पाऊस, पुणेकरांनी नव्या ऋतूचे केले नामकरण; म्हणे, “हा तर हिवसाळा”

७७ वर्षीय नारायण मूर्ती म्हणाले, “ते वय वेगळे होते. पण मी वर्षांनुवर्ष जपलेले नात्याबद्दल बोलत आहे आणि जेव्हा लग्नानंतर तुम्हाला मुले होतात तेव्हा ते नाते अधिक चांगले होते. दोन्ही जोडीदारांना त्यांचे नाते मजेदार बनवायचे आहे, मग त्यासाठई कोणताही मसाला टाकवा लागू दे.” याशिवाय अनेक मुद्द्यांवरही दोघांनी गप्पा मारल्या.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narayana murthy recalls ticketless 11 hour train journey for wife sudha murty snk
Show comments