‘इन्फोसिस’चे सह-संस्थापक नारायण मूर्ती टाइम मॅनेजमेंट म्हणजेच वेळेच्या नियोजनाला फार महत्त्व देतात. विशेष म्हणजे केवळ शाब्दिक महत्त्व पटवून देण्याऐवजी आपल्या कृतीमधून आपल्याला खरोखरच वेळेच्या नियोजनाची चिंता आहे हे अधोरेखित करण्याचा नारायण मूर्तींचा प्रयत्न असतो. हेच महत्त्व पटवून देण्यासाठी काही वर्ष ते रोज सकाळी ६ वाजून २० मिनिटांना ऑफिसमध्ये पोहचलेले असायचे. सकाळी ६.२० ते रात्री अगदी आठ आणि नऊ वाजेपर्यंत ते काम करायचे. ‘मनी कंट्रोल’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये ७६ वर्षीय नारायण मूर्तींनी ‘इन्फोसिस’ला उभं करण्यासाठी दिलेला वेळ आणि त्यामुळे मुलांसाठी न देता आलेला वेळ याबद्दल भाष्य केलं त्यावेळेस हा किस्सा सांगितलं.

मुलाखतीदरम्यान मुलाखतकाराने नारायण मूर्तींचं कामावर किती प्रेम आहे हे सांगताना ते रोज ‘इन्फोसिस’च्या कॅम्पसमध्ये सकाळी सात वाजेपर्यंत हजर असायचे असा उल्लेख केला. त्यावेळी मूर्तींनी या मुलाखतकाराला “सात नाही ६ वाजून २० मिनिटांनी” असं सांगितलं. सकाळी सहा वाजून २० मिनिटांनी ऑफिसला पोहचण्याची सवय मी स्वत:ला लावून घेतली होती असं त्यांनी सांगितलं. अगदी २०११ साली निवृत्त होईपर्यंत आपण कटाक्षाने ही गोष्ट पाळली असंही ते म्हणाले.

Successful treatment of an elderly woman suffering from hernia and comorbidities Pune news
हर्नियासह सहव्याधींनी ग्रस्त ज्येष्ठ महिलेवरील उपचारांचे आव्हान, दोन महिन्यांच्या प्रयत्नांनंतर यशस्वी
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
After the death of Dr Subhash Chaudhary his family has no maintenance fund and other financial benefits Nagpur news
दिवंगत कुलगुरूंच्या कुटुंबावर आर्थिक संकट, निधनाच्या तीन महिन्यानंतरही …
CIDCO considers extending lottery process for 26 000 houses under My Favorite CIDCO House scheme
२६ हजार घरांच्या सोडत प्रक्रियेस मुदतवाढीचा प्रस्ताव विचाराधीन
jan dhan account marathi news
अकरा कोटी निष्क्रिय जनधन खात्यांमध्ये १४,७५० कोटी पडून
more than 1700 retirees people in nashik benefit from DLC scheme of Postal Department
सेवानिवृत्तवेतन धारकांच्या मदतीला टपाल विभाग, जिल्ह्यात १७०० पेक्षा अधिक जणांना डीएलसी योजनेचा लाभ
mhada lottery 2024 konkan board extend application deadline for 2264 homes
म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया
Hafiz Assad statue vandalized
असाद घराण्याची पाच दशकांची सत्ता संपुष्टात

ठरलेल्या वेळी ऑफिसला पोहोचण्याच्या आपल्या या सवयीबद्दल बोलताना नारायण मूर्तींनी, “तरुणांना वेळेत ऑफिसवर पोहोचण्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी मी हे करायचो,” असं सांगितलं. ‘इन्फोसिस’ला उभं करण्यासाठी अनेक गोष्टींचा त्याग करावा लागला. त्यातही माझी दोन्ही मुलं रोहन आणि अक्षता या दोघांबरोबर वेळ घालवता आला नाही हा माझा सर्वात मोठा त्याग होता, असंही नारायण मूर्ती म्हणाले.

“उद्योग सुरु करणं हे हिंमतीचं काम आहे. हे त्यागाचं आणि धमक दाखवण्याचं काम आहे,” असं नारायण मूर्ती म्हणाले. “या साऱ्यामध्ये सर्वात मोठा तोटा आमच्या मुलांचा म्हणजेच अक्षता आणि रोहनचा झाला. खरी गोष्ट ही आहे की मला त्यांच्याबरोबर वेळ घालवता आला नाही. सुधानेच त्यांची काळजी घेतली,” असं नारायण मूर्ती म्हणाले. “त्यांना हव्या नको त्या सर्व गोष्टी, त्यांचं यश, त्यांची पीएचडी, स्टॅण्डफोर्डमधील शिक्षण हे सारं तिच्यामुळेच शक्य झालं,” असंही नारायण मूर्ती म्हणाले.
 
१९८१ साली नारायण मूर्तींनी पत्नीकडून १० हजार रुपये कर्ज घेऊन ‘इन्फोसिस’ची स्थापना केली होती. सध्या या कंपनीमध्ये ३ लाख २५ हजार लोक काम करतात. या कंपनीचं मूल्य ८० बिलीयन अमेरिकी डॉलर्स इतकं आहे.

Story img Loader