PM Modi 30 Years Old Clean Shave Look: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या तीन दिवस अमेरिका दौऱ्यावर आहेत. जंगी स्वागतानंतर नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या निवासस्थानी म्हणजेच व्हाईट हाऊसला भेट दिली. यावेळी भाषणादरम्यान मोदींनी ३० वर्षांपूर्वीची खास आठवण सुद्धा सांगितली. ते म्हणाले की, “३० वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्हाईट हाऊसला सामान्य माणसासारखी भेट दिली होती. पंतप्रधान झाल्यानंतर मी येथे अनेकदा आलो आहे मात्र भारतीय-अमेरिकन नागरिकांसाठी एवढ्या मोठ्या संख्येने व्हाईट हाऊसचे दरवाजे उघडण्याची ही पहिलीच वेळ आहे.” या भाषणांनंतर सोशल मीडियावर मोदींचा व्हाईट हाऊस बाहेरील ३० वर्षांपूर्वीचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या फोटोसह केलेल्या दाव्यानुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तरुणपणीचा लुक पाहायला मिळत आहे. मोदींनी आपल्या मित्रांबरोबर व्हाईट हाऊसबाहेर पोज दिली होती. यावेळी साधा पांढरा सदरा, खांद्याला बॅग व आणि क्लीन शेव्ह अशा रूपात मोदींची झलक पाहायला मिळत आहे.

दरम्यान, हा फोटो व्हायरल होताच अनेकांनी मोदींची स्तुती करत हे फोटो शेअर करायला सुरुवात केली आहे. “व्हाईट हाऊसच्या समोर ते व्हाईट हाऊसच्या टॉपला ही खूप मोठी झेप आहे. याला प्रगती म्हणतात. मोदींना नावं ठेवली तरी त्यांच्या प्रगतीला नाकारता येणार नाही” अशा कॅप्शन व कमेंटसह ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत आहे.

हे ही वाचा<< पंतप्रधान मोदी न्यूयॉर्कमध्ये मुक्कामाला असलेल्या हाॅटेलचे एका रात्रीचे भाडे ऐकून व्हाल थक्क; किंग साइज बेडसाठी..

दरम्यान, नरेंद्र मोदी यांच्या व्हाईट हाऊसमधील भाषणांनंतर अनेक स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे. काही व्हिडीओजमध्ये भाषणानंतर US काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मोदींसह सेल्फी व त्यांची सही घेण्यासाठी होत्या हे सुद्धा पाहायला मिळत आहे. मोदींची लोकप्रियता दाखवणाऱ्या या व्हिडिओबाबत आपलं मत काय हे कमेंटमध्ये कळवायला विसरू नका .

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi 30 years old clean shave look in front of white house people call it progress after us congress modi speech svs