Narendra Modi ‘Hindu Card’ Comment Video: लाइटहाऊस जर्नलिझमला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर होत असल्याचे लक्षात आले. पोस्टसह शेअर केलेल्या क्लिपमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी राजकारणात हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याची कबुली देताना दिसत आहेत. व्हायरल क्लिपच्या सुरुवातीला नरेंद्र मोदी म्हणतात, “हिंदुत्व हा भाजपाचा निवडणूकीसाठीचा अजेंडा कधीच राहिला नाही. हिंदुत्व हा आमचा विश्वास आहेच आणि राजकारण करण्याचं/ खेळण्याचं एक कार्ड आहे”.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Manisha Chobey याने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइलवर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील समान दाव्यासह हा व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
१.०४ मिनिटांच्या व्हायरल व्हिडीओमध्ये पंतप्रधान मोदी पत्रकाराला मुलाखत देताना दिसतायत. मोदींनी तरुणपणी ही मुलाखत दिली असावी असं दिसतंय, यावरूनच प्रथम हे सिद्ध होतं की हा व्हिडीओ खूप जुना आहे. सुमारे १६ सेकंदांनंतर एक वेगळाच ऑडिओ ऐकू येतो, ज्यातील आवाज पत्रकार अर्णब गोस्वामी पंतप्रधान मोदींची मुलाखत घेत असल्यासारखा वाटतोय .रिव्हर्स इमेज सर्चमुळे आम्हाला अचूक परिणाम मिळत नसल्यामुळे आम्ही पीएम मोदींच्या जुन्या मुलाखती शोधल्या.
यातून आम्हाला पीएम मोदींची झी न्यूजला २४ वर्षांपूर्वी दिलेली मुलाखत आढळली. १९९८ मधील पंतप्रधान मोदींच्या या मुलाखतीची क्लिप व्हायरल व्हिडिओमधील कीफ्रेम्स प्रमाणेच दिसत होती.
सुमारे १०.०५ मिनिटांच्या सुमारास पत्रकार त्यांना पक्षाच्या हिंदुत्ववादी धोरणाबाबत त्यांचे मत विचारले ज्यावर पंतप्रधान मोदी म्हणतात, “हिंदुत्व ये भारतीय जनता पार्टी का कभी चिनवी नारा नहीं रहा है. हिंदुत्व ये हमारे लिए एक आर्टिक्ल ऑफ़ फेथ है, ये चुनावी खेल खेलने के लिए एक ताश का पत्ता ‘नहीं’ है”
अनुवाद: हिंदुत्व ही भाजपसाठी कधीही निवडणूकीसाठी केलेली घोषणा नव्हती. तो आमच्या विश्वासाचा भाग आहे, निवडणुकीचा खेळ खेळण्यासाठी हे कार्ड तर अजिबातच नाही.
व्हायरल व्हिडीओमध्ये “नही” (नाही) हा शब्द वगळण्यात आला आहे.
व्हायरल व्हिडीओच्या अर्ध्या भागामध्ये पीएम मोदी हिंदू ही जीवन जगण्याची शैली असल्याचे सांगत होते. मुलाखतीत ऐकलेला दुसरा आवाज पत्रकार अर्णब गोस्वामी यांचा आहे, म्हणून आम्ही अर्णब गोस्वामी यांनी घेतलेली पंतप्रधान मोदींची मुलाखत तपासली. यामुळे आम्हाला नरेंद्र मोदींच्या तत्कालीन टाइम्स नाऊच्या अर्णब गोस्वामी यांना दिलेल्या मुलाखतीचा भाग दिसला. जेव्हा अर्णब यांनी बीजेपीच्या जाहीरनाम्यात हिंदूंच्या उल्लेखाविषयी विचारले तेव्हा पंतप्रधान मोदींनी उत्तर दिले की ही एक जीवनशैली आहे.
हे ही वाचा<< हिंदू साध्वीचा मुस्लीम पुरुषाशी विवाह? Viral फोटोमध्ये दिसणारे हे चेहरे कोण? अखेर सत्य आलं समोर
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुकीत हिंदुत्वाचे कार्ड खेळल्याची कबुली दिली नाही. त्यांच्या जुन्या मुलाखतीची एडिटेड व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.