MP Chirag Paswan Leaked Video: लाइटहाऊस जर्नलिझमला नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असल्याचे लक्षात आले. यामध्ये पासवान हे त्यांच्या दिवंगत वडिलांच्या फोटोसमोर शूटिंग करताना दिसले. चिराग पासवान हे बिहारच्या राजकारणातील प्रसिद्ध नाव रामविलास पासवान यांचे सुपुत्र आहेत. वडिलांच्या फोटोसमोर उभं राहुन वडील गेल्याचं दुःख व्यक्त करताना सुद्धा पासवान यांना स्क्रिप्ट देण्यात आली होती अशा दाव्यासह हा व्हिडीओ शेअर केला जात आहे. चिराग पासवान हे पूर्वी अभिनय क्षेत्रात सक्रिय होते त्यामुळे त्यांची शोक व्यक्त करण्याची पद्धत सुद्धा अभिनयच असल्याचे म्हणत लोकांनी या व्हिडीओवर टीका सुद्धा केला आहे. इतकंच नव्हे तर खाली मोदी व पासवान यांचा एकत्र फोटो जोडून दोन बेस्ट अभिनेते असेही लिहिण्यात आले आहे. याबाबत आम्ही केलेल्या तपासात या व्हिडीओमागील खरी कहाणी समजली आहे.
काय होत आहे व्हायरल?
X युजर Truth One ने व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही व्हिडीओमधून कीफ्रेम मिळवून तपास सुरू केला आणि नंतर या फ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केले. याद्वारे आम्हाला नॅशनल हेराल्डवर २७ ऑक्टोबर २०२० रोजी प्रकाशित झालेले एक वृत्त सापडले.
आम्हाला अनेक बातम्या आढळल्या ज्यात चिराग पासवान त्याच्या वडिलांना शोक व्यक्त करण्यापूर्वी तालीम करत असल्याचा उल्लेख आहे.
आम्हाला २९ ऑक्टोबर २०२० रोजी ब्रूट इंडियाने पोस्ट केलेला व्हिडिओ देखील सापडला, ज्यात कॅप्शन मध्ये म्हंटले होते: चिराग पासवान यांनी लीक झालेल्या व्हिडीओवरून बिहारच्या मुख्यमंत्र्यांवर टीका केली
बिहार निवडणुकीपूर्वी हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात आला होता. चिराग पासवान यांनी यावर स्पष्टीकरण देणारा व्हिडीओ शेअर करून मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी ही क्लिप लीक केल्याचे सांगितले होते.
आम्हाला या बाबतीत एक बातमी देखील सापडली.
बातमीत नमूद केले आहे: लोक जनशक्ती पार्टी (एलजेपी) नेते चिराग पासवान यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एक व्हिडिओ लीक केल्याबद्दल दोष दिला आहे. या व्हिडीओमध्ये पासवान हे त्यांचे वडील रामविलास पासवान यांच्या हार घातलेल्या फोटोशेजारी भाषण रेकॉर्ड करण्याची तयारी करताना दिसतात. बिहारमध्ये पहिल्या दिवसाच्या मतदानाच्या एक दिवस आधी लीक झालेला व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
बिहार विधानसभा निवडणूक २०२० साठी त्यांच्या पक्षाच्या जाहीरनाम्यावरील संदेशाचे चित्रीकरण करत असताना लीक झालेला व्हिडिओ काढण्यात आल्याचे चिराग पासवान यांनी स्पष्ट केले होते. सोशल मीडियावर केल्या जात असलेल्या दाव्यांना विरोध करण्यासाठी त्यांनी एक व्हिडिओ देखील जारी केला होता.
निष्कर्ष: LJP नेते चिराग पासवान यांचा जुना व्हिडिओ ज्यात ते वडिलांच्या फोटोजवळ उभे राहून पक्षाच्या जाहीरनाम्यावरील संदेशाचा व्हिडीओ शूट करत होते हाच व्हिडीओ आता लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा व्हायरल होत आहे.