PM Modi Kedarnath Mandir Video: अकरावे ज्योतिर्लिंग श्री केदारनाथ धामचे दरवाजे १० मे २०२४ रोजी सकाळी ७ वाजता यात्रेकरूंसाठी उघडणार आहेत. महाशिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर ही घोषणा करण्यात आली होती. याच केदारनाथ धाम येथील एक व्हिडीओ सध्या प्रचंड चर्चेत आहे. लाइटहाऊस जर्नलिझमला या व्हिडिओची एक वेगळी बाजू आढळून आली आहे. यात आपण पाहू शकता की, एक व्यक्ती हातावर चालत केदारनाथ मंदिराची प्रदक्षिणा घालताना दिसत आहे. ३ मिनिट ४७ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

काय होत आहे व्हायरल?

फेसबुक यूजर देशप्रेमी जगदीश चन्द्र ने व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडिओ शेअर करत आहेत.

तपास:

आम्ही InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आणि मिळवलेल्या कीफ्रेमवर रिव्हर्स इमेज सर्च करत तपासणी सुरू केली. आम्हाला फेसबुक पेजवर ५ ऑगस्ट २०२१ रोजी अपलोड करण्यात आलेला एक व्हिडिओ आढळला ज्यामध्ये खूप स्पष्ट चित्र समोर येत आहे. व्हिडिओ खोट्या दाव्यासह शेअर केला जात होता. पण व्हिडिओ स्पष्ट होता. व्हिडिओवरील मजकुरात “Create by श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग.” असे लिहिलेले आढळून येते. त्यानंतर आम्ही “केदारनाथ मंदिराभोवती हातांवर परिक्रमा” या सर्च टर्मचा वापर करून गूगल कीवर्डचा शोध घेतला.

यामुळे आम्हाला India Tv च्या युट्युब चॅनेल वर तीन वर्ष आधी अपलोड केलेला एक व्हिडीओ आढळला.

कॅप्शन मध्ये लिहले होते: Kedarnath Temple priest walks on his hands on International Yoga Day.
(भाषांतर: आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त केदारनाथ मंदिराचे पुजारी हातावर चालत आहेत)

हा व्हिडिओ Kanak News ने देखील वापरला होता.

आम्हाला आढळले की हे व्हिडिओ ANI वरून घेतले आहेत आणि पुजाऱ्याचे नाव संतोष त्रिवेदी आहे.

व्हिडिओवरील मजकुरात “श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग निर्मित” असे म्हटले असल्याने, आम्ही “श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग” नावाचे Facebook पेज आणि ग्रुप्स शोधले यासाठी फेसबुकवर कीवर्ड सर्चचा देखील वापर केला.

आम्हाला, श्री केदारनाथ ज्योतिर्लिंग नावाचे पेज सापडले ज्याचे तब्बल १४ लाख फॉलोवर्स आहेत.

व्हिडिओमध्ये परिक्रमा करताना दिसणारी व्यक्ती आचार्य संतोष त्रिवेदी असल्याचे कॅप्शनमध्ये नमूद केले आहे.

निष्कर्ष: केदारनाथ मंदिराचे पुजारी संतोष त्रिवेदी हातावर चालत परिक्रमा करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला असून व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi completed pradikshana to kedarnath temple walking on hands in 3 minutes viral video amongst loksabha election 2024 svs