Narendra Modi Photo Viral: इंडियन एक्स्प्रेसला सोशल नेटवर्किंग वेबसाइट्सवर मोठ्या प्रमाणात शेअर करण्यात येणारे काही फोटो आढळले, ज्यात तामिळनाडूच्या रस्त्यांवर ‘वनक्कम मोदी’ (शब्दशः अर्थ म्हणजे हॅलो किंवा मोदींना शुभेच्छा) रंगवलेले दिसत होते.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
व्हायरल दावे काय आहेत?
ट्विटर यूजर Ponguleti Sudhakar Reddy, ने ‘Vanakkam Modi’ असे चित्र प्रोफाइल वर शेअर केले.
दुसरे ट्विटर यूजर Sameet Thakkar ने देखील व्हायरल चित्र शेअर केले.
तसेच काही यूजर्स नि, ‘Go Back Modi’ असे रस्त्यावर लिहलेले छायाचित्र शेअर केले.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सारखे दिसणारे हे दोन्ही चित्र, तामिळनाडूचे आहे, असा दावा ट्विटर यूजर्स करत आहेत.
तपास:
इंडियन एक्सप्रेसने फोटोवर एक साधा गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून तपास सुरू केला. गुगल लेन्स सर्चने आम्हाला ‘गो बॅक मोदी कोलकाता स्ट्रीट’ असा संदर्भ दिलेले फोटो दाखवून दिले. हाच संदर्भ वापरून गूगल वर शोधल्यावर, आम्हाला स्टॉक इमेजस वेबसाइट, गेटी इमेजस वर अपलोड केलेले फोटो सापडले.
आश्चर्य म्हणजे या फोटोंवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कोलकाता दौऱ्याचा लोकांनी निषेध केला आहे असे कॅप्शन देण्यात आले आहेत. त्यानंतर आम्ही हेच चित्र इंडेक्स सर्च द्वारे शोधले. यातून आम्हाला ११ जानेवारी, २०२० रोजीचे एक ट्विट सापडले.
मयूख रंजन घोष या पत्रकाराचे आणखी एक ट्विट आम्हाला आढळले. या ट्विटला कॅप्शन दिले होते की, “हा कोलकाता मधील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. #Esplanade. लाखो लोक ये-जा करतात, खचाखच भरलेली ट्रॅफिक असते. आज रात्री हे ठिकाण पहा. रस्ते भित्तिचित्रात बदलले, रहदारी नाही, सर्व रस्ते अडवले, विद्यार्थी रात्रभर आंदोलन करत आहेत. हे आहे #Kolkata #modiinkolkata”
आता अधिक चांगल्या प्रतीचे चित्र उपलब्ध असल्याने, आम्ही चित्र झूम करून पाहिले आणि हे चित्र ‘मेट्रो चॅनल कंट्रोल पोस्ट हरे स्ट्रीट पोलिस स्टेशन’ समोर काढले असल्याचे आढळले.
त्यामुळे सध्या व्हायरल होणारे फोटो हे डिजिटली बदलल्याचे आढळून आले. मजकूर ‘वनक्कम मोदी’ नसून, २०२० पासून बंगालमधील CAA NRC निषेधादरम्यान ‘गो बॅक मोदी’ असा आहे, असे तपासात लक्षात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी राज्याचा दौरा केल्यामुळे तामिळनाडूमध्ये ‘गो बॅक मोदी’ रंगले होते, असेही अनेक दावे तपास करताना समोर आले.
हे ही वाचा<< “मुस्लिम मुलींना प्रेमाचं आमिष दाखवा, शरीरसंबंध… ” RSS चं हिंदू तरुणांना पत्र? व्हायरल पोस्टचं सत्य जाणून व्हाल थक्क
अधिक माहितीसाठी, आम्ही मयूख रंजन घोष यांच्याशी संपर्क साधला, ज्यांनी हे चित्र ट्विटरवर पोस्ट केले. त्यांनी पुष्टी केली की कोलकाता येथील एनआरसीच्या निषेधादरम्यानचे हे २०२० चे जुने फोटो आहेत. हे फोटो हारे स्ट्रीट पोलिस स्टेशनजवळील कोलकाता येथील एस्प्लानेड भागातील असल्याचेही त्यांनी सांगितले. रस्त्यावर असलेली जेल व्हॅनही कोलकाता पोलिसांची असल्याची माहितीही त्यांनी दिली.
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तामिळनाडू दौऱ्यादरम्यान व्हायरल होत असलेले फोटो, ज्यात ‘वनक्कम मोदी’ असे म्हटले आहे, ते डिजिटली एडिट केले आहे. मूळ फोटोमध्ये ‘गो बॅक मोदी’ असे लिहिले आहे. हा फोटो तामिळनाडूचा नाही तर २०२० मध्ये कोलकाता येथे झालेल्या CAA NRC निषेधाचे आहे.