PM Narendra Modi Garba Dance Video: लाइटहाऊस जर्नलिझमला एक व्हिडिओ ट्विटरवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात असल्याचे समोर आले. व्हिडिओमध्ये गरबा डान्स करताना दिसणारी व्यक्ती भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा दावा करण्यात आला होता. अलीकडे AI तंत्रज्ञानाचा वापर करून मोदींना गाताना दर्शवणारे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. या व्हिडीओमध्ये हा गमतीत केलेला प्रकार आहे हे चटकन लक्षात येते पण सध्या मोदींना गरबा करताना दाखवणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसणारी व्यक्ती खरोखरच पटकन ओळखणे शक्य होत नाही. प्रथमदर्शनी हे स्वतः नरेंद्र मोदीच आहेत असे तुम्हालाही वाटू शकते. हेच वाटल्याने काही नेटकऱ्यांनी हा व्हिडीओ तुफान शेअर करत कमेंट्सही केल्या. पण याची खरी बाजू काय हे आता आपण जाणून घेणार आहोत.
काय होत आहे व्हायरल?
ट्विटर यूजर, Radhika Chaudhary ने व्हायरल व्हिडिओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.
इतर वापरकर्ते देखील हाच व्हिडिओ शेअर करत आहेत.
तपास:
पोस्टवरील कमेंट्स तपासून आम्ही आमचा तपास सुरू केला. एका युजरने व्हिडिओ मधील व्यक्ती पीएम मोदी नसल्याचे स्क्रीनशॉट शेअर करत सांगितले. हा स्क्रीनशॉट विकास महंते यांच्या प्रोफाईलचा होता.
आम्ही गुगलवर हे प्रोफाईल शोधले आणि विकास महंते यांचे इंस्टाग्राम अकाउंट सापडले.
आम्हाला त्यांच्या प्रोफाइलवर एक रील सापडली, जिथे विकास महंते यांना लंडन दिवाळी मेळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते आणि त्यांचा पोशाख व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणेच होता.
या व्हिडिओचे बॅकग्राउंड आणि डान्सर्सचे आउटफिट व्हायरल झालेल्या व्हिडिओप्रमाणेच होते. तपासाच्या पुढच्या टप्प्यात आम्ही Artist’s manager या Instagram प्रोफाइल ला संपर्क केला जे विकास महंते यांचे प्रोफाइल मॅनेज करते. त्यांनी पुष्टी केली की व्हायरल व्हिडिओमधील व्यक्ती प्रत्यक्षात विकास महंते आहे, जे हुबेहुब पंतप्रधान नरेंद्र मोदींसारखा दिसतात.
Bumble वरून डेटवर गेला आणि तिने १५ हजाराला लावला चुना; तरुणींना नेमून कॅफे करतंय ‘अशी’ फसवणूक?
निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गरबा करत असल्याचा दावा केलेला व्हायरल व्हिडिओ प्रत्यक्षात त्यांच्या सारख्या दिसणाऱ्या विकास महंते यांचा आहे. व्हायरल दावा खोटा आहे.