PM Modi Comment Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या प्रचारसभांमधील वेगवेगळे व्हिडीओ सध्या ऑनलाईन व्हायरल होत आहेत. लाइटहाऊस जर्नलिझमला सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर असाच एक व्हिडीओ शेअर होत असल्याचे आढळले. या १४ सेकंदाच्या व्हिडीओमध्ये भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी एका जाहीर भाषणादरम्यान भाजपा कधीही शक्तिशाली राष्ट्र बनवू शकत नाही असे म्हणताना दिसून येतात. या व्हिडीओमागे नेमकं किती तथ्य आहे हे जाणून घेऊया..

काय होत आहे व्हायरल?

X यूजर Mangalaram Bishnoi ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

anupam kher pays tribute to dr manmohan singh
Video : “डॉ. मनमोहन सिंग यांच्या व्यक्तिरेखेला…”; अनुपम खेर यांनी व्हिडीओ शेअर करत माजी पंतप्रधानांना वाहिली श्रद्धांजली, म्हणाले…
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Navri Mile Hitlarla
यश-रेवतीच्या नात्यामुळे सासू-सून पुन्हा समोरासमोर येणार; ‘नवरी मिळे हिटलरला’ मालिकेत पुढे काय घडणार?
pushpa 2 song controversy
चेंगराचेंगरीनंतर ‘पुष्पा २’बद्दल नवा वाद, निर्मात्यांना युट्युबवरून हटवावं लागलं ‘हे’ लोकप्रिय गाणं; कारण काय?
prathamesh parab regret for not getting enough screens
“महाराष्ट्रात स्क्रिन्स मिळत नाहीयेत यापेक्षा दुर्दैव…”, प्रथमेश परबने व्यक्त केली खंत; म्हणाला, “मायबाप प्रेक्षकांपर्यंत…”
Eknath shinde and ajit pawar (1)
NDA च्या बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रतिनिधी गैरहजर; एकनाथ शिंदे म्हणाले, “स्वार्थ भावनेने…”
Paaru
Video: “मी तुझ्याशिवाय आता श्वासही…”, आदित्यने पारूसमोर दिली प्रेमाची कबुली? प्रोमोवर प्रसाद जवादेच्या पत्नीच्या कमेंटने वेधले लक्ष
Manoj Jarange On Devendra Fadnavis
Manoj Jarange : “आता खरी मजा, हिशेब चुकता करण्याची…”, मनोज जरांगेंचा सरकारला इशारा, तर फडणवीसांनीही दिलं प्रत्युत्तर

इतर वापरकर्ते देखील असाच दावा करत व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

InVid टूलमध्ये व्हिडिओ अपलोड करून आम्ही आमचा तपास सुरू केला. हा व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजस्थानमधील रॅलीचा असल्याचे आम्हाला आढळले. आम्हाला NDTV वर एक बातमी मिळाली, ज्याचे शीर्षक होते: काँग्रेस भारताला कधीही मजबूत बनवू शकत नाही: राजस्थानमध्ये पंतप्रधान मोदी यांचे विधान

https://www.ndtv.com/video/news/news/congress-can-never-make-india-strong-pm-modi-in-rajasthan-777758

एनडीटीव्हीवर अपलोड केलेला १० मिनिटे १८ सेकंदाचा व्हिडिओ राजस्थानच्या जालोरचा होता. १ मिनिट १७ व्या सेकंदाला पंतप्रधान मोदी म्हणतात, ‘काँग्रेस कधीही भारताला मजबूत बनवू शकत नाही’.

हा अहवाल इतर अनेक माध्यम संस्थांनीही प्रसारित केला होता.

https://www.indiatvnews.com/rajasthan/pm-modi-rally-says-congress-can-never-make-india-strong-symbol-of-instability-slams-india-bloc-bjp-lok-sabha-elections-2024-latest-news-2024-04-21-927301

नरेंद्र मोदींच्या यूट्यूब चॅनलवर आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जालोर सभेचा संपूर्ण व्हिडीओ सुद्धा दिसून आला.

१७ मिनिटे ५५ व्या सेकंदावर ते काँग्रेस एक मजबूत राष्ट्र बनवू शकत नाही असे म्हणताना दिसत आहेत.

हे ही वाचा<< “त्या विधवांचं मंगळसूत्र..”, मोदींना योगी आदित्यनाथांनी विचारला जाब? प्रश्न केला, पण Video मधून मोठा भाग गायब, पाहा

निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “भाजपा भक्कम राष्ट्र बनवू शकत नाही”, असे म्हटलेले नाही उलट ते म्हणाले की “काँग्रेस मजबूत भारत बनवू शकत नाही.” एडिट केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Story img Loader