Narendra Modi Ignored Joe Biden On Purpose: लाइटहाऊस जर्नलिझमला मोठ्या प्रमाणावर शेअर होत असलेला व्हिडिओ आढळून आला ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ७ शिखर परिषदेदरम्यान अमेरिकेचे राष्ट्रपति जो बायडन यांना हात मिळवण्यास नकार दिल्याचा दावा केला जात आहे. बायडन यांनी भारतीय निवडणुकांमध्ये हस्तक्षेप केल्याचे मोदींना खटकले आणि त्यांनी युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकाला त्यांची जागा दाखवली असेही काही युजर्स म्हणत आहेत. बायडन यांच्याकडे दुर्लक्ष केल्यावर मग पुढे मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांना भेटायला गेले.मेलोनी जेव्हा परिषदेसाठी आलेल्या पाहुण्या राष्ट्रांच्या प्रमुखांचे स्वागत करत होत्या तेव्हाची ही क्लिप आहे. आमच्या तपासात या व्हिडीओची खरी बाजू जाणून घेऊया

काय होत आहे व्हायरल?

X यूजर @Congress_Indira ने व्हायरल व्हिडीओ, दाव्यासह आपल्या प्रोफाइल वर शेअर केला.

navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत
South African fans object to Surya's catch
सूर्यकुमार यादवच्या ‘कॅच’वरुन पेटला नवा वाद, दक्षिण आफ्रिकन चाहत्याने VIDEO शेअर करत केला फसवणूक झाल्याचा दावा
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
devendra fadnavis analysis
“आपण तीन नाही, तर चार पक्षांशी लढत होतो, तो चौथा पक्ष म्हणजे…”; देवेंद्र फडणवीसांकडून लोकसभेतील निकालाचं विश्लेषण!
Rohit Sharma Statement on India Win
IND vs ENG: टीम इंडियाच्या फायनल प्रवेशासह रोहित शर्माचे विराट कोहलीवर मोठे वक्तव्य; म्हणाला, “१५ वर्ष खेळलेल्या…”
10 congress mlas from vidarbha in pune for campaigning of Pune Lok Sabha candidate ravindra dhangekar
Exit Poll 2024 : काँग्रेसला एक्झिट पोल्सचे अंदाज अमान्य; पवन खेरा म्हणाले, “२००४ साली अटल बिहारी वाजपेयींना…”
What happens to your body when you have sex every day
रोज सेक्स केल्याने शरीर, मन व नात्यात काय बदल होतात? थट्टा, मस्करी न करता डॉक्टरांनी दिलेली ही माहिती वाचा
sai tamhankar bus incident
“बसने प्रवास करताना मागून एक हात शरीराभोवती आला अन् मी…”, सई ताम्हणकरने सांगितला धक्कादायक प्रसंग

इतर वापरकर्ते देखील समान दाव्यासह हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.

तपास:

व्हिडिओची सुरुवात थोडीशी अस्पष्ट आहे पण ही क्लिप अलीकडील G7 शिखर परिषदेचा असल्याचे दिसते कारण व्हिडिओच्या शेवटी दिसणारी व्यक्ती या इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आहेत. त्यानंतर आम्ही गूगल कीवर्ड सर्च करून तपासाला सुरुवात केली. फर्स्टपोस्टच्या यूट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेला व्हिडीओ आम्हाला आढळला, हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केल्या जात असलेल्या क्लिपच्या तुलनेत स्पष्ट होता.

व्हायरल व्हिडीओमध्ये दिसणारी व्यक्ती जो बायडन नसून G7 शिखर परिषदेतील सपोर्ट स्टाफपैकी एक व्यक्ती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना पुढे जाण्यासाठी ही व्यक्ती मार्ग दाखवत होती. फर्स्टपोस्टवर पोस्ट केलेल्या दुसऱ्या व्हिडीओमध्ये, जॉर्जिया मेलोनी अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांना अभिवादन करताना दिसतात.

आम्ही सीएनएन-न्यूज 18 च्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेलं समान फुटेजही पाहिलं.

या दोन्ही व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदींना मार्ग दाखवणारी व्यक्ती जो बायडन नाही, हे स्पष्टपणे दिसत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जी ७ शिखर परिषदेत अमेरिकेचे अध्यक्ष बायडन यांच्याशी इटलीमध्ये संभाषण केले आणि नरेंद्र मोदींच्या अधिकृत YouTube चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये दिसत असल्याप्रमाणे दोन्ही नेत्यांनी हात सुद्धा मिळवला.

हे ही वाचा<< नीट प्रकरणात सहा आरोपींना काँग्रेस कार्यालयातून अटक? Video समोर येताच ‘हे’ सत्यही आलं बाहेर, पोलिसांनी अटक केली पण..

निष्कर्ष: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती जो बायडन यांच्याशी हात मिळवण्यास नकार दिला नाही. व्हायरल क्लिपमध्ये दिसणारी व्यक्ती अलीकडेच इटलीमध्ये झालेल्या G7 शिखर परिषदेतील सपोर्ट स्टाफची सदस्य आहे. व्हायरल दावे खोटे आहेत.