पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मानणारे मोदी भक्त कमी नाहीत. अनेकांना तर ते देवाच्या स्थानी आहे. पण बिहारमध्ये राहणा-या श्रवण शाहा यांची गोष्ट काहीशी वेगळी आहे. मोदी त्यांच्यासाठी श्रीराम आहेत तर ते स्वत: हनुमान आहेत. म्हणूनच हनुमानासारखा वेश करत आणि छातीजवळ मोदींचा फोटो लावून हा भक्त मोदींच्या प्रत्येक सभेला हजेरी लावतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वाचा : पैसे नव्हे तर रम देऊन कर्ज फेडणार ‘हा’ देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भक्त नेहमीच त्यांच्या सभेला उपस्थिती लावतात. श्रवण शाहा हा त्यांच्यापैकीच एक आहेत. मोदींच्या शक्य असतील तितक्या सभेला श्रवण उपस्थित राहतात. ते नेहमीच हनुमानाचा वेश धारण करतात. डोक्यावर मुकुट, हातात गदा आणि छातीवर मोदींचा फोटो अडकवून ते मोदींच्या प्रत्येक सभेत हजर असतात. हनुमानाने राम भक्ती दाखवण्यासाठी आपली छाती फाडून दाखवली होती. त्याने देखील थर्माकोलवर फाडलेली छाती दाखवली आहे आणि त्यात मोदींचा फोटो ठेवला आहे. या थर्माकोलला दोरी बांधून ती दोरी गळ्यात अडकवत हा मोदी भक्त प्रत्येक सभेला जातो. हातातल्या गदेवर देखील भाजप आणि ‘नमो नम:’ असे त्याने लिहिले आहे. ‘आज तक’ या हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या एका मुलाखतीत आपण मोदींचे भक्त असून ते आपल्याला श्रीरामाच्या स्थानी आहेत असे तो सांगतो. इतकेच नाही तर मोदींनी नोटाबंदीचा निर्णय घेतला आहे तो उत्तम असल्याचे त्याने सांगितले.

VIDEO : दोन कासवांचा वर्चस्वासाठी संघर्ष

सोमवारी कानुपर येथे मोदींची रॅली होती. यात श्रवण देखील नेहमीप्रमाणे हनुमानाच्या वेशात आला होता. या रॅलीमध्ये श्रवण आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. आपण मोदींना प्रत्यक्षात पाहिले नसले तरी मोदींवर माझी अपार भक्ती असल्याचे त्याने सांगितले.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi kanpur rally showed the true devotee of modi