सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत २०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. शिवाय २०२४ ला कोणत्या पक्षाला बहुमत मिळणार? आणि कोण पंतप्रधान होणार? याबाबत प्रत्येकजण आपापलं मत व्यक्त करताना दिसत आहे. शिवाय याच मुद्यावरुन सोशल मीडियावर दररोज वेगवेगळ्या पोस्ट शेअर केल्या जातात, ज्यामध्ये २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत कोणता पक्ष जिंकेल आणि पंतप्रधान कोण होईल? या संबंधित प्रश्न विचारले जात आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

सध्या सोशल मीडियावर असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक तरुण लोकांमध्ये जाऊन २०२४ मध्ये देशाचा पंतप्रधान कोण होईल? असा प्रश्न विचारताना दिसत आहे. यावेळी त्याच्या प्रश्नाचं एका आजीने असं काही उत्तर दिलं आहे. जे ऐकल्यानंतर तुम्हालाही हसू आवरणं कठीण होईल यात शंका नाही. शिवाय आजीने दिलेलं उत्तर नेटकऱ्यांना एवढं आवडलं आहे की त्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात सुरु आहे.

हेही वाचा- “आम्हाला लग्न करण्याचा…” लग्नादिवशी अपंग वधूला करावा लागला अडचणींचा सामना; सरकारी कार्यालयातील गैरसोयींवर केली टीका, म्हणाली…

व्हायरल व्हिडीओमध्ये एक तरुण आजीला विचारतो, “२०२४ मध्ये देशाचा पुढचा पंतप्रधान म्हणून तुम्ही कोणाकडे बघता, राहुल गांधी की नरेंद्र मोदी का आणखी तिसरा कोणी?” यावर आजी म्हणते, “बाळा, आता आम्ही जायच्या तयारीत आहोत, याचा निर्णय तुम्हीच घ्या.” असं बोलून आजी तिथून निघून जाते. आजीने दिलेल्या या भन्नाट आणि जबरदस्त उत्तरामुळे तो तरुण “व्वा क्या बात है” असं म्हणत तिथून निघून जातो.

आजीचा हा जबरदस्त व्हिडिओ @digpunews नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘भारताचा पुढचा पंतप्रधान कोण असेल? राहुल गांधी किंवा नरेंद्र मोदी- सार्वजनिक सर्वेक्षण.’ तर हा व्हिडीओ आतापर्यंत करोडो लोकांनी पाहिला आहे. तर ४ मिलियनहून अधिक लोकांनी तो लाईक केला आहे. तर हजारो नेटकरी या व्हिडीओवर मजेशीर प्रतिक्रिया देताना दिसत आहेत. एका युजरने लिहिलं, भन्नाट आणि जबरदस्त आजी. तर दुसर्‍याने लिहिलं, माझे उत्तर, जेव्हा मी नोटीस पीरियडवर असतो. तर नरेंद्र मोदी आणि राहुल गांधींच्या समर्थकांनाही हा व्हिडीओ पाहून हसू आवरता येत नाहीये, अशाही कमेंट नेटकरी करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi or rahul gandhi who is the prime minister of 2024 grandmas amazing answer to young mans question video goes viral jap