नरेंद्र मोदी हे आजच्या घडीला जगातील सर्वात प्रभावशाली नेत्यांपैकी एक आहेत. ते केवळ भारतातच नव्हे तर जगभरात प्रसिद्ध आहेत. त्यांची एक झलक पाहण्यासाठी इतर देशांमध्ये राहणारे भारतीय आतुर दिसतात. ते कुठल्याही देशात गेले तरी त्यांचे जंगी स्वागत होते. ते देशाचे पंतप्रधान जरी असले तरी त्याआधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते, मात्र नरेंद्र मोदी नेते नसते तर काय झाले असते, याचा कधी विचार केला आहे का? आता विचार करा जर नरेंद्र मोदी जर रॉकस्टार असते तर कसे दिसले असते. असा विचार करून कदाचित त्यांचे असे रूप पाहण्याची इच्छा तुमच्या मनात निर्माण झाली असावी. नरेंद्र मोदींचा हाच अवतार सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. नरेंद्र मोदींचं हे रुप बघून तुम्ही शॉक व्हाल.
नरेंद्र मोदी जर रॉकस्टार असते..
मात्र सोशल मीडियावर व्हायरल झालेले हे फोटो खरेखुरे नसून आर्टिफिशल इंटेलिजन्सची कमाल आहे. AI म्हणजेच आर्टिफिशल इंटेलिजन्स या क्षेत्रामध्ये गेल्या काही महिन्यांमध्ये मोठी क्रांती झाल्याचे पाहायला मिळते. आर्टिफिशल इंटेलिजन्सने (AI) अनेकांचे आयुष्यच बदलून टाकले आहे, असे म्हणायला हरकत नाही. या तंत्रज्ञानाच्या मदतीने डिजिटल निर्मितीच्या जगातील काही अशक्य गोष्टी शक्यप्राय होताना दिसत आहेत. यात सोशल मीडियावर AI च्या मदतीने काढलेल्या काही हटके फोटोंची यादीच व्हायरल होत आहे.
पाहा फोटो –
हेही वाचा – Viral video: सिंहाचा वृद्ध व्यक्तीवर भयानक हल्ला, एका क्षणात केला खेळ खल्लास
या नव्या तंत्राच्या मदतीने अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य होताना दिसत आहेत. AI च्या मदतीने कलाकार डिजिटल माध्यमामध्ये काम करत कलाकृती तयार करत आहेत. सोशल मीडियावर सध्या असे अनेक फोटो व्हायरल होत आहेत.जे पाहून आपणही आश्चर्यचकीत होतो. असाच एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वास्तविक या नेत्यांची छायाचित्रे आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने तयार करण्यात आली आहेत. नरेंद्र मोदींपासून अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन, बराक ओबामा, डोनाल्ड ट्रम्प, रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि उत्तर कोरियाचे हुकूमशहा किम जोंग उन यांचा रॉकस्टार ‘अवतार’ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.