BJP Rally & Congress Crowd Video Facts: रविवारी,२१ एप्रिलला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजस्थानमध्ये जाहीर सभा घेतली. पंतप्रधानांनी जालोर आणि बांसवाडा येथे जाहीर सभांना संबोधित केले ज्यावेळी त्यांनी काँग्रेसच्या विधानांवर टोला लगावण्याची संधी सुद्धा हेरली. मोदींच्या जालोर भेटीनंतर, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दीचा एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. ही गर्दी मोदींच्या लोकप्रियतेची झलक आहे यावरून यंदाच्या लोकसभेत कुणाचा विजय होणार हे लक्षात येतच असेल अशा प्रकारच्या कमेंट्स करून हा व्हिडीओ व्हायरल करण्यात येत आहे. पण तपासात या व्हिडीओबाबत वेगळी माहिती समोर येत आहे.
काय होत आहे व्हायरल?
X यूजर Sunil Bishnoi BJP ने व्हायरल व्हिडीओ आपल्या प्रोफाइल वर शेअर केला होता
इतर वापरकर्ते देखील समान दाव्यांसह हाच व्हिडीओ शेअर करत आहेत.
तपास:
आम्ही या सर्व पोस्टचे कमेंट सेक्शन तपासून आमचा तपास सुरू केला. काही वापरकर्त्यांनी निदर्शनास आणून दिले की हा व्हिडिओ जालोरमध्ये झालेल्या काँग्रेसच्या सभेचा आहे.
२०१९ मध्ये राहुल गांधी यांनीही जालोरला भेट दिली होती.
हा व्हिडिओ ४ वर्षांपूर्वी २५ एप्रिल २०१९ पासून काढण्यात आला आहे.
डिस्क्रिप्शन मध्ये लिहले होते: रामसीन का यह आज का वीडियो देख लो चुनाव में जालोर से कौन जीत रहा है पता पड़ जायेगा।
आम्हाला २५ एप्रिल २०१९ रोजी फेसबुकवर अपलोड केलेला व्हिडीओ देखील सापडला.
रामसेनला भेट देणाऱ्या काँग्रेस नेत्यांच्या आणि काँग्रेसच्या रॅलीबाबतही अन्य पोस्ट आम्हाला पाहायला मिळाल्या.
दरम्यान, २०१९ मध्ये याच तारखेच्या आसपास जालोरमधील भाजपच्या रॅलीतून अपलोड केलेले काही व्हिडिओ देखील आम्हाला आढळले.
हे ही वाचा<< नागपूरकरांचा संताप? मतदानावेळी EVM वर शाई फेकल्याचा Video चर्चेत, ‘ही’ मोठी चूक लपवण्याचा प्रयत्न उघड
निष्कर्ष: २०१९ मध्ये शूट केलेला जालोर राजस्थान येथील व्हिडिओ सध्याचा राजस्थानमधील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित केलेल्या रॅलीतील असल्याचे सांगत शेअर केला जात आहे. व्हायरल दावा खोटा आहे.