आजकाल शुभेच्छा पाठवणा-या अनेकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्वत:हून रिट्विट करत शुभेच्छा दिल्या आहेत. त्यामुळे ट्विटरवर अनेक नेटीझन्सना जवळजवळ धक्काच बसला आहे. उत्तर प्रदेशच्या निवडणूक जिंकल्यानंतर अनेकांनी ट्विट करत मोदींना विजयाच्या आणि लगोलग होळीच्याही शुभेच्छा दिल्या. आश्चर्य म्हणजे यातल्या अनेकांना खुद्द मोदींनी उत्तरही दिले होते. पण एका ट्विटर युजरच्या बाबतीत थोडा वेगळा प्रकार घडला. ‘ मी मोदींसाठी नाही तर मोदी माझ्यासाठी काम करतात’ असे ट्विट त्याने केले होते. आता या ट्विटची पंतप्रधान थोडीच दखल घेणार असे त्यालाही वाटले असणार म्हणा. पण नंतर जे काही झाले त्याने ४४० वोल्ह्टचा धक्का त्याला नक्कीच बसला असणार. कारण मोदींनी रिट्विट करत त्याला उत्तर दिले. ‘तू म्हणतोस ते अगदी बरोबर आहे, म्हणूनच तर मी प्रधानसेवक आहे’ असे ट्विट मोदींनी लगेच केले.
अजित सिंह नावाच्या व्यक्तीने एक ट्विट केले होते. ‘तू मोदींसाठी काम करतोस का? असे मला एकाने विचारले, त्यावर मी मोदींसाठी नाही तर मोदी माझ्यासाठी काम करतात असे उत्तर मी त्याला दिले.’ असे ट्विट अजितने केले होते. यात मोदींना टॅग करायला तो विसरला नाही आणि अगदी अनपेक्षितरित्या मोदींनीही अजितचे हे ट्विट वाचले आणि लगेच त्याला रिप्लायही केला. ‘तू बोलतोस ते बरोबर आहे, प्रत्येक भारतीयाचा प्रधान सेवक बनून मला आनंद झाला आहे.’ असे उत्तर त्यांनी दिले. आता हे वाचल्यानंतर अजितला धक्का बसला असणार हे नक्की. दोन दिवसांपूर्वी नूपूर या ट्विटर अकाऊंटवरूनही असेच काहीसे ट्विट करण्यात आले होते. मोदी आणि अमित शहा कधीच आपल्या ट्विटला उत्तर देत नाही, या दोघांचांही घरोबा असून आपल्याविरुद्ध ते कट करत आहे असे विनोदी ट्विट तिने केले होते. यावर अमित शहांनी लगेच उत्तर देत, तूला दुर्लक्षित केल्याबद्दल लगेच उपषोणाला बसू नकोस असे गंमतीशीर उत्तर तिला दिले होते.
One of my follower casually asked me: Do you work for @narendramodi ?
I smiled and said: No dear, he works for me..#IAmNewIndia— Ajeet Singh (@Ajeetvijaysingh) March 14, 2017
Absolutely. Happy to be the Pradhan Sevak for each and every Indian. https://t.co/BEreA1GNVJ
— Narendra Modi (@narendramodi) March 14, 2017