Prime Minister Narendra Modi Viral Video: लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. यंदा रडत- अडत का होईना पण एनडीए सरकार स्थापण्यासाठी सक्षम झालं आहे. देशात २९१ ठिकाणी भाजपा प्रणित एनडीए आघाडीवर आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीच्या अगदी उलट असं काहीसं चित्र सध्या मतमोजणीनंतर समोर आलं आहे. देशात इंडिया आघाडीला मागील दोन लोकसभा निवडणुकांच्या तुलनेत मोठं यश मिळाला आहे. इंडिया आघाडीच्या गटात सध्या जल्लोष चालू आहे तर भाजपा जिंकूनही फार उत्साह दिसून येत नाही. मोदींनी सुद्धा आजच्या निकालानंतर आपल्या सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. एनडीएवर तिसऱ्यांदा विश्वास दाखवण्यासाठी जनता जनार्दनाचे आभार मानत मोदींनी पोस्ट केली आहे. मोदींच्या या अधिकृत पोस्टवर साहजिकच लोकांनी वेगवगेळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत पण त्याहीपेक्षा मोदींचा एक व्हिडीओ नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतोय. यामध्ये मोदींच्या आवाजात गाणं ऐकून नेटकरी फारच खुश झाले आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अलीकडे कोणताही मोठा इव्हेन्ट असल्यास मीम्स, रील्स व्हायरल होणं हे साहजिक असतं, लोकसभा निवडणूक तरी याला अपवाद कसा असेल? अनेक मीम पेजेसवर मोदींचा आवाज मॉर्फ करून एक व्हिडीओ शेअर करण्यात आला होता. व्हिडीओमध्ये ‘चमकीला’ या चित्रपटातील ‘मेनू विदा करो’ हे गाणं वाजताना ऐकू येत आहे. मोदींचा एका सभेतील व्हिडीओ सुरुवातीला जोडलेला आहे मग मोदी अटल सेतू वरून चालत असतानाची क्लिप एडिट करून जोडलेली आहे. मागे वाजणारं गाणं हे AI च्या माध्यमातून मोदींच्या आवाजाला मिळतं जुळतं भासेल असं एडिट केलेलं आहे. हे गाणं आणि एडिटिंग बघून नेटकरी हा व्हिडीओ तुफान शेअर करत आहेत. ४ जूननंतर फेअरवेल (निरोप समारंभाला) हे गाणं वाजेल असा मजेशीर टोला या व्हिडीओमध्ये लिहिण्यात आला आहे.

Video: मोदींच्या गाण्याची चर्चा, नेटकरी झाले लोटपोट

दरम्यान, मोदींनी आपल्या मूळ पोस्टमध्ये म्हटलंय की, “भारताच्या इतिहासातील हा एक अभूतपूर्व क्षण आहे. या प्रेम व आशीर्वादांसाठी मी माझ्या कुटुंबियांना देशवासीयांना नमन करतो. मी देशवासियांना हे विश्वासाने सांगू इच्छितो की त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्यासाठी आम्ही नवी ऊर्जा, नवे संकल्प घेऊन पुढे वाटचाल करणार आहोत. सर्व कार्यकर्ते ज्यांनी या कालावधीत समर्पणाने, अथक परिश्रम घेतले त्यांचे मी आभार मानतो, अभिनंदन करतो. “

हे ही वाचा<<पाकिस्तानात मोदींच्या विजयानंतर जल्लोष? लोकांना नाचताना पाहून भारयीय बुचकळ्यात, Video मध्ये खरं काय घडतंय?

लोकसभा निवडणुकीतील निकालाची आकडेवारी पाहिल्यास मोदींचा वाराणसीमध्ये विजय झाला आहे. मोदींना वाराणसीतून ६ लाख १२ हजार ९७० मते प्राप्त झाली. मोदींनी १ लाख ५२ हजार ५१३ मतांच्या आघाडीने काँग्रेसच्या अजय राय यांना मात दिली आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi singing video after loksabha elections result latest update pm modi voice mainu vida karo song viral watch trending memes svs