-अंकिता देशकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

PM Narendra Modi Stunned By Gautam Adani Potrait: ‘लाइटहाऊस जर्नलिझम’ला काही फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर शेअर होत असल्याचे लक्षात आले. या फोटोमध्ये , पंतप्रधान नरेंद्र मोदी काही फ्रेम केलेल्या चित्रांकडे पाहत असल्याचे दिसत आहे, ज्यात त्यांचे आणि उद्योगपती गौतम अदाणी यांचे चित्र असल्याचे दिसते. हे चित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘जनशक्ती प्रदर्शना’ला दिलेल्या भेटीदरम्यानचे आहेत, असे समजतेय. यावरून नेटकरी जोरदार टीका करत आहेत. अनेकांनी मोदींना टार्गेट करत २०,००० कोटी कोणाचे आहेत मोदीजी, असे म्हणत फिरकी घेतली आहे. नेमका हा काय प्रकार आहे हे पाहू या…

काय होत आहे व्हायरल?

ट्विटर हॅण्डल RaGa Army ने हे फोटो शेअर करत काही प्रश्न आपली पाठच सोडत नाहीत, अशी कॅप्शन दिली आहे.

अन्य काही युजर्सनी ट्विटर व फेसबुकवरसुद्धा जहरी टीका करत हे फोटो शेअर केले आहे.

तपास:

‘लाइटहाऊस जर्नलिझम’ने सर्व फोटोवर एक साधा ‘गूगल रिव्हर्स इमेज सर्च’ वापरून तपासाची सुरुवात केली.

फोटो १:

१४ मे २०२३ रोजी ‘पंजाब केसरी’मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीत आम्हाला पहिला फोटो दिसला .

‘इकॉनॉमिक टाइम्स’ने शेअर केलेल्या व्हिडीओमध्येदेखील आम्हाला हा फोटो आढळला.

आम्हाला हा फोटो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर अकाऊंटवरदेखील अपलोड केलेले दिसले.

फोटो २:

आम्ही दुसऱ्या चित्रावरदेखील ‘गूगल रिव्हर्स इमेज सर्च’ चा वापर केला. आम्हाला १४ मे २०२३ रोजी NDTV वर प्रकाशित झालेल्या एका बातमीत हा फोटो सापडला.

पीआयबीच्या प्रसिद्धीपत्रकातदेखील आम्हाला हा फोटो आढळला.

आम्हाला हा फोटो ‘मन की बात अपडेट्स’ या ट्विटर हॅण्डलद्वारे अपलोड केलेला आढळला.

फोटो ३:

आम्ही तिसऱ्या फोटोवर ‘गूगल रिव्हर्स इमेज सर्च’चा वापर केला. आम्हाला हा फोटो NDTV वर त्याच लेखात अपलोड केलेला दिसला.

आम्हाला ‘मन की बात अपडेट्स’ च्या ट्विटर हॅण्डलवर अपलोड केलेली मूळ प्रतिमादेखील आढळली.

आम्हाला ‘अमृत महोत्सव’ च्या फेसबुक पेजवर अपलोड केलेले याचे मूळ फोटो दिसले.

हे ही वाचा<< “मुस्लिम मुलींना प्रेमाचं आमिष दाखवा, शरीरसंबंध… ” RSS चं हिंदू तरुणांना पत्र? व्हायरल पोस्टचं सत्य जाणून व्हाल थक्क

निष्कर्ष: व्हायरल फोटो ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गौतम अदाणींच्या पोर्ट्रेटकडे बघताना दिसतात ते एडिटेड आहे. खरे फोटो हे नॅशनल गॅलरी ऑफ मॉडर्न आर्ट, नवी दिल्लीच्या ‘जनशक्ती प्रदर्शना’तील आहे.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Narendra modi trolled for photos with gautam adani netizens ask where are 20 thousand crores modiji viral pictures fact check svs
Show comments